झारखंड-त्रिकूट रोपवे दुर्घना : २० तासांपासून हवेत लटकले ४८ लोक, बचावकार्यात अडथळे

मुंबई तक

झारखंडमधल्या सर्वात उंच रोपवेवर दुर्घटना घडल्याने गेल्या २० तासांपासून ४८ जण हवेत लटकले आहेत. रविवारी संध्याकाळी ५ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. त्रिकूट रोपवेच्या दोन ट्रॉलीज एकमेकांमध्ये धडकल्या. त्यानंतर हे लोक एका डोंगरावर अडकले. रात्रीपासून एनडीआरएफचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसंच लष्कराचीही मदत बोलावली गेली. मात्र अद्यापही हे लोक त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

झारखंडमधल्या सर्वात उंच रोपवेवर दुर्घटना घडल्याने गेल्या २० तासांपासून ४८ जण हवेत लटकले आहेत. रविवारी संध्याकाळी ५ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. त्रिकूट रोपवेच्या दोन ट्रॉलीज एकमेकांमध्ये धडकल्या. त्यानंतर हे लोक एका डोंगरावर अडकले. रात्रीपासून एनडीआरएफचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसंच लष्कराचीही मदत बोलावली गेली. मात्र अद्यापही हे लोक त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची सुटका करण्यात यश आलेलं नाही.

रविवारी सकाळी रामनवमीची पूजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी शेकडो पर्यटक आले होते. रोपवे ची एक ट्रॉली खाली येत होती आणि तेव्हाच एक ट्रॉली वरती जात होती. या ट्रॉलींची टक्कर झाली. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले. जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा दोन डझन म्हणजेच २४ ट्रॉली हवेत होत्या. घाईगडबडीने काही लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं.

या घटनेला २० तास उलटून गेले आहेत. तरीही ४८ जण हवेतच लटवकले आहेत. हे सगळेजण १८ ट्रॉलींमध्ये आहेत. लष्कराचं हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहचलं मात्र हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वेगाने १८ ट्रॉलीज हलू लागल्या. त्यामुळे आता या ट्रॉलीजमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव धोक्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp