Jio Phone Next लॉन्च, प्रचंड चर्चेत असलेल्या स्मार्टफोनचे फीचर्स नक्की पाहा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

रिलायन्स जिओने Jio Phone Next हा स्मार्टफोन लाँच केला आहे. मागील काही दिवसांपासून या फोनची बरीच चर्चा सुरु होती. पाहा याचे नेमके फीचर्स काय आहेत.

हे वाचलं का?

रिलायन्स जिओच्या Jio Phone Next स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल रिअर आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Jio Phone Next मध्ये 5.45-इंचीचा मल्टीटच डिस्प्ले आहे. 720×1440 एचडी स्क्रीन रेझ्युलेशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह अँटी फिंगरप्रिंट कोटिंगही आहे.

ADVERTISEMENT

Jio Phone Next मध्ये Qualcomm 215 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा क्वॉड कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्याचा वेग 1.3GHz पर्यंत आहे.

Jio Phone Next स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम देण्यात आली आहे.

Jio Phone Next मध्ये 32GB इंटर्नल स्टोरेज आहे. तसेच मायक्रो एसडी कार्ड याच्या मदतीने मेमरी 512GB पर्यंत वाढवता येईल.

जिओच्या या स्मार्टफोनमध्ये 3500 mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल सिम सपोर्ट असून त्यात नॅनो साइजचं सिम वापरता येणार आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये मायक्रो यूएसबी पोर्ट आणि हेडफोन जॅक आहे.

ब्लूटूथ आणि वायफायची कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनमध्ये एक्सलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत.

या फोनची मूळ किंमत ही 6,499 रुपये आहे. पण 1,999 रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT