आज लॉन्च होणार Jio Phone Next : जाणून घ्या या 4G फोनच्या किंमत, फिचर्ससह सर्व काही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रिलायन्सचा jio phone next स्मार्टफोनची प्रतिक्षा आज संपणार आहे. जगप्रसिद्ध कंपनी Google च्या भागीदारीने हा फोन तयार करण्यात आला आहे. हा फोन ईएमआयवर घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया जिओ फोन नेक्स्टबद्दल… (jio phone next price key features)

ADVERTISEMENT

Reliance ने आधीच केलेल्या घोषणेप्रमाणे Jio Phone Next ची विक्री 4 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून केली जाणार आहे. Jio कडून ग्राहकांना काही ऑफर देखील दिल्या जाणार आहेत. जिओचा हा स्मार्टफोन ग्राहकांना फक्त 1,999 रुपये भरून खरेदी करता येणार आहे. उर्वरित पैसेनंतर ईएमआयद्वारे भरावे लागणार आहे.

हे वाचलं का?

Jio Phone Next स्मार्टफोनचे फीचर्स

Jio Phone Next हा Qualcomm प्रोसेसर आणि Android आधारित Pragati OS वर चालणारा अल्ट्रा-अफोर्डेबल स्मार्टफोन आहे. Jio कडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे प्रगती OS ही Android चं ऑप्टिमाइझ व्हर्जन आहे. जे खास JioPhone Next साठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये 10 भारतीय भाषांसाठी सपोर्ट मिळणार आहे.

ADVERTISEMENT

Jio Phone Next मध्ये 5.45-इंचीचा मल्टी टच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसेच स्क्रीन रेझ्युलेशन एचडी प्लस आहे. याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचं 3 प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. त्याचबरोबर अँटी फिंगरप्रिंट कोटिंगही आहे.

ADVERTISEMENT

Jio Phone Next मध्ये Qualcomm 215 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा क्वॉड कोअर प्रोसेसर असून, त्याचा वेग 1.3GHz पर्यंत आहे. स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम असणार आहे.

Jio Phone Next मध्ये 32GB इंटर्नल स्टोरेज असून, मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट सुविधाही आहे. त्याच्या मदतीने जिओ फोन नेक्स्ट वापरकर्त्याला मेमरी 512GB पर्यंत वाढवता येणार आहे.

Jio Phone Next मध्ये दोन सिमची सुविधा असणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये मायक्रो यूएसबी पोर्ट आणि हेडफोन जॅक आहे. ब्लूटूथ आणि वायफायची कनेक्टिव्हिटी देखील आहे.

या स्मार्टफोनमध्ये एक्सलेरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे, तर रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. Jio Phone Next ची बॅटरी 3,500mAh क्षमतेची आहे.

Jio Phone Next मध्ये Google कॅमेरा F देण्यात आला आहे, जो HDR ला देखील सपोर्ट करतो. याशिवाय नाईट मोड आणि सॉफ्टवेअर बेस्ड पोर्ट्रेट मोडलाही सपोर्ट करते.

किती रुपयांना मिळणार?

Jio Phone Next या स्मार्टफोनची मूळ किंमत ही 6,499 रुपये आहे. पण 1,999 रुपयात हा फोन खरेदी करता येणार आहे. ग्राहकांसाठी कंपनीने ईएमआयचा पर्यायही दिलेला आहे. 1,999 रुपये देऊन तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. मात्र, त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला त्याचा EMI भरावा लागेल. तुम्ही 18 महिने किंवा 24 महिन्यांचा देखील EMI सेट करू शकता. या स्मार्टफोनची एकूण किंमत ही 6 हजार 400 रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT