Jitendra Awhad : आव्हाडांनी काढलं नवं प्रकरण, महादेव गित्तेचा दवाखान्यातील व्हिडीओ, निशाण्यावर कोण?
महादेव गित्ते यांनी तेव्हा बापू आंधळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महादेव गित्ते यांच्या घरावर बापू आंधळे आणि त्यांच्या गुडांनी हल्ला केला होता. तसंच गाड्यांची तोडफोड केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महादेव गित्ते यांच्यासोबत काय घडलं होतं?

वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

वाल्मिक कराड आणि बापू आंधळेचा काय संबंध?
बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून 2024 रोजी गोळीबार करण्यात आला होता. परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात हा थरार घडला होता. या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलाय.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट?
हे ही वाचा >> Mumbai Crime News : 20 वर्षीय महिलेवर अत्याचार, स्टेशनवर बेशुद्धावस्थेत आढळली महिला, नराधम रिक्षा चालक?
"29 जूनला 2024 रोजी माहादेव गित्ते याच्यावर वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाला. जखमी इसमाचा आंबेजोगाई मेडिकल कॅालेज मधे उपचार घेत आसताना 02 जुलै 2024 रोजी महादेव गित्ते याने बनवलेला व्हीडीओ" आहे असं आव्हाड म्हणाले आहेत.
हे ही वाचा >> Saif Ali Khan : करीना कुठं होती, चोर कसा आला, तैमुरनं काय केलं... सैफने पोलीस जबाबात सगळं सांगितलं
महादेव गित्ते यांनी तेव्हा बापू आंधळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महादेव गित्ते यांच्या घरावर बापू आंधळे आणि त्यांच्या गुडांनी हल्ला केला होता. तसंच गाड्यांची तोडफोड केली होती. तसंच काही लोकांनी गोळीबार केल्याचे आरोप गित्ते यांनी केले होते. यापैकी तीन गोळ्या लागल्यानंतर महादेव गित्ते जखमी झाले, याप्रकरणी त्यांनी तक्रार केली होती, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तर महादेव गित्ते यांनी सांगितल्यानुसार आपल्यावर हल्ला करायला आलेले असतानाच अंदाधूंद गोळीबार करत असतानाच बापू आंधळेचा गोळी लागून मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार 29 जून 2024 ला बापू आंधळेचा गोळ्या लागल्यानं मृत्यू झाला. बापू आंधळे हा अजित पवार गटाचा सरपंच होता. परळीमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला होता. याच प्रकरणात बबन गित्ते, मुकुंद गित्ते, महादेव गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर विरोधातच नोंदवलेल्या तक्रारीमध्ये वाल्मिक कराडसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.