प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘एक लाखाची डिमांड’ : वाढदिवसादिवशीच बेड्या
जुन्नर : येथील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह जुन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष केतनकुमार पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री या दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे कारवाईदिवशी पाटील यांचा वाढदिवस होता. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास […]
ADVERTISEMENT
जुन्नर : येथील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह जुन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष केतनकुमार पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री या दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे कारवाईदिवशी पाटील यांचा वाढदिवस होता.
याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो वरिष्ठांकडे पाठविण्यात आला. मात्र यातील काही त्रुटींची पूर्तता करण्यासाठी तो पुन्हा पोलिस ठाण्याकडे आला. याकाळात तपास अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यामुळे हा गुन्हा तपासकामी अमोल पाटील यांच्याकडे आला.
यानंतर अमोल पाटील यांनी “मी फिर्यादीचा जबाब घेतला आहे. या गुन्ह्यात अनेक वाढीव कलमांचा समावेश होऊ शकतो. तो न होण्यासाठी मला एक लाख रुपये त्वरीत द्याठ, अशी तक्रारदाराकडे वारंवार मागणी केली. तसेच, त्यांच्यावतीने ॲड केतनकुमार पडवळ यांनी तक्रारदारांना फोन करून मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. तक्रारदारानेही 50 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सुरुवातीला 50 पैकी 25 हजार रुपये आणिउर्वरित रक्कम 15 नोहेंबरला देण्याचे ठरले होते. अमोल पाटील व त्यांच्या वतीने वकील केतन पडवळ यांनी लाचेची मागणी केली. दरम्यान, या प्रकरणी फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपाधिक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ज्योती पाटील व पथकाने शनिवारी सापळा रचला होता. लाचलुचपत विभागाने तक्रारदारकडे व्हाईस रेकॉर्डरखील दिला होता.
दरम्यान, अमोल पाटील यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारली नाही. मात्र त्यांच्यावतीने केतन पडवळ यांनी १ लाख रुपयांची लाच मागणी करून स्वीकारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोघांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT