कल्याण: चुकीच्या उपचारामुळे दीड वर्षीय चिमुकली दगावली, कोर्टाच्या आदेशानंतर डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण मध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, पोलिसांकडे याप्रकरणी पुरावे नसल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र, आता याबाबत थेट कोर्टाच्या आदेशानंतर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. पोलिसात तक्रार दाखल करुनही आरोपी डॉक्टरवर कोणतीही कारवाई […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, कल्याण: कल्याण मध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, पोलिसांकडे याप्रकरणी पुरावे नसल्याने कुठल्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत करण्यात आली नव्हती. मात्र, आता याबाबत थेट कोर्टाच्या आदेशानंतर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.
पोलिसात तक्रार दाखल करुनही आरोपी डॉक्टरवर कोणतीही कारवाई होत नसल्याने निराश झालेल्या आई-वडिलांनी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट कल्याणच्या फौजदारी न्यायालयात धाव घेतली.
यावेळी कल्याण न्यायालयाने मुलीच्या आई-वडिलांनी डॉक्टरसोबत झालेल्या बोलण्याचे स्टिंग ऑपरेशन ग्राह्य धरुन याच व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या आधारावर संबंधित डॉक्टर आणि त्याच्या एका सहकार्यवर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर एस के आलम व ताज अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आता तपास सुरु झाला आहे.