पिस्तुल टेस्ट करण्यासाठी हवेत गोळीबार, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याणच्या काळा तलाव परिसरात एका पिस्तुल तस्कराला शनिवारी रात्री महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईने पाठलाग करत पकडले. पिस्तुल तस्कर कल्याणच्या काळा तलाव भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गस्तीवर असताना काही नागरिकांनी पोलिसांना एका टपरीसमोर गोळीबार झाल्याची माहिती दिली.

पोलिसांनी अवघ्या काही मिनीटांमध्येच तिकडे पोहचत गणेश राजवंशी या पिस्तुल तस्कराला ताब्यात घेतलं आहे. पिस्तुल टेस्ट करण्यासाठी गणेशने हवेत गोळीबार केला आणि आजुबाजूच्या लोकांना याची माहिती कळाली.

कोल्हापूर: नराधम पतीचे सत्तूराने पत्नीवर सपासप वार, महिलेला वाचविण्याऐवजी मोबाइलमध्ये सुरु होतं शूटिंग

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आरोपीकडून पोलिसांनी एक कट्टा, एक देशी पिस्तुल आणि ६ काडतुसं जप्त केली आहेत. गणेशविरुद्ध डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं कळतंय. त्याने ही पिस्तुल कुठून आणली आणि तो कोणाला विकण्याच्या तयारीत होता याचा तपास पोलीस करत आहेत.

अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने ‘असा’ काढला काटा

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीवरुन, महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होणमाने पोलिस निरिक्षक प्रदीप पाटील यांनी पोलिसांची दोन पथक तयार केले. पोलीस कल्याण पश्चिम काळा तलाव  परिसरात गस्त घालत होते या तस्कराच्या मागावर होते याच दरम्यान एका व्यक्तीने काळा तलाव परिसरात असलेल्या एका टपरी समोर हवेत गोळीबार केल्याची माहिती काही नागरीकांनी पोलिसांना दिली . पोलिसांनी तत्काळ तलाव परिसरात धाव घेतली  गोळीबार करणारा तरुण त्या ठिकाणी दिसताच त्याला जागीच अटक केली.

ADVERTISEMENT

आरोपी गणेश हा नवी मुंबईच्या घणसोली परिसरात राहतो. त्याने केलेल्या गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला. गोळीबारा दरम्यान काही लोक त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ते लोक कोण होते. ते कुठे गेले याचा शोध पोलीस घेत आहेत.

मुरबाड : निवृत्त शिपाई झाला डॉक्टर, चुकीचा उपचार करुन घेतला ५ जणांचा जीव

    follow whatsapp

    ADVERTISEMENT