कोरोनाला कसं हरवलं हे सांगणार नाही कारण…; कोरोनावर मात केल्यावर कंगनाची पोस्ट चर्चेत
देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनाही त्याची लागण झालीये. यामध्ये अभिनेत्री कंगनाचा पण समावेश होता. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगणाला कोरोनाची लागण झाली. मात्र आता तिने कोरोनावर मात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाने याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री कंगना राणौतची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणते, […]
ADVERTISEMENT
देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनाही त्याची लागण झालीये. यामध्ये अभिनेत्री कंगनाचा पण समावेश होता. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगणाला कोरोनाची लागण झाली. मात्र आता तिने कोरोनावर मात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाने याबाबत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री कंगना राणौतची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “नमस्कार आज माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मला खूप काही सांगायची इच्छा आहे की मी कोरोनाला कसं हरवलं पण, मला सांगण्यात आलं आहे की कोरोनाच्या चाहत्यांना नाराज करू नको.”
हे वाचलं का?
ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर इन्स्टाग्रामनेही डिलीट केली कंगनाची पोस्ट
कंगना तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पुढे म्हणते, “हा असे काही लोक आहेत ज्यांना कोरोनविषयी वाईट बोलल्यावर वाईट वाटतं. असो तुम्हा सगळयांच्या आशिर्वाद आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
8 तारखेला कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं सांगितलं होतं. या पोस्टमध्ये कंगनाने जर तुम्ही घाबरला तर तो तुम्हाला घाबरवेल. चला या कोरोनाला संपवू. हा कोरोना काहीच नाही, केवळ एक साधा ताप आहे, असं लिहिलं होतं. मात्र कंगनाच्या या पोस्टनंतर इन्स्टाग्रामने तिची ही पोस्ट डिलीट केली. यावर कंगनाने नाराजीही व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT