कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य, नीलम गोऱ्हेंनी केली पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी
कंगना रणौतने आपल्या देशाबाबत जे वक्तव्य केलं आहे ते वरचा मजला रिकामा असल्यचं लक्षण आहे. तिने जे वक्तव्य जाहीर मुलाखतीत केलं आहे ते देशाचा अपमान आणि स्वातंत्र्यलढ्याचा अपमान आहे. त्यामुळे तिचा पुरस्कार काढून घ्यावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करणार आहे असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? ‘वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र […]
ADVERTISEMENT
कंगना रणौतने आपल्या देशाबाबत जे वक्तव्य केलं आहे ते वरचा मजला रिकामा असल्यचं लक्षण आहे. तिने जे वक्तव्य जाहीर मुलाखतीत केलं आहे ते देशाचा अपमान आणि स्वातंत्र्यलढ्याचा अपमान आहे. त्यामुळे तिचा पुरस्कार काढून घ्यावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करणार आहे असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
‘वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेते सुभाषचंद्र बोस या लोकांबद्दल बोललो तर या लोकांना माहित होते की रक्त सांडावं लागेल. पण ते हिंदुस्थानी-हिंदुस्थानींचं रक्त सांडू नये.. अर्थातच त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण तेव्हा जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती. आपल्याला खरं स्वातंत्र्य हे 2014 साली मिळालं आहे.’
हे वाचलं का?
या कार्यक्रमात कंगना असंही म्हणाली की, ‘काँग्रेसची सत्ता असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जेव्हा मी राष्ट्रवाद, सैन्य सुधारणा आणि माझ्या संस्कृतीचा प्रचार करते तेव्हा लोक म्हणतात की, मी भाजपचा अजेंडा चालवत आहे. खरं तर हा मुद्दा भाजपचा अजेंडा का असावा.. हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे.’
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला आहे. कंगना हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. पण अनेकांनी तिला जोरदार ट्रोल देखील केलं आहे. आता नीलम गोऱ्हेंनी कंगनाचा पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
भाजप खासदार वरूण गांधींनीही केली टीका
ADVERTISEMENT
भाजप खासदार वरुण गांधींनी कंगानाचा व्हिडीओ शेअर करत ‘या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह असा सवाल उपस्थित केला आहे. वरुण गांधीनी एक ट्विट केलंय. यात ते म्हणाले, ‘कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान! या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?’ असा सवाल उपस्थित करत वरुण गांधींनी कंगानाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT