Kasba Peth : “आता बापटांचा नंबर का?”; कसब्यात भाजपला फटका बसणार?
Kasba Peth assembly Constituency By Election 2023 : कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघात (assembly Constituency) भाजपसमोर (Bjp) नाराजीनाट्य निर्माण करण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, भाजपने एकीकडे लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांच्याच पत्नीला उमेदवारी दिली, तर कसबा पेठ मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील […]
ADVERTISEMENT

Kasba Peth assembly Constituency By Election 2023 : कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघात (assembly Constituency) भाजपसमोर (Bjp) नाराजीनाट्य निर्माण करण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. चिंचवड (Chinchwad) आणि कसबा पेठ या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, भाजपने एकीकडे लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) यांच्याच पत्नीला उमेदवारी दिली, तर कसबा पेठ मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा होती, मात्र हेमंत रासने (Hemant Rasane) यांना दिलीये. यावरूनच ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा सुरू झालीये. त्याला कारण ठरलं पुण्यात (Pune) झळकलेले बॅनर्स.
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रम कसबा पेठ व चिंचवड मतदारसंघात निवडणूक होत आहे. या जागांवर भाजपकडून कुणाला संधी दिली जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. दोन्ही जागांवर कुटुंबातीलच उमेदवार दिले जातील, असंही म्हटलं गेलं.
भाजपने चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, मात्र कसबा पेठ मधून भाजपनं मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. कसबा पेठ मधून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्यानं नाराजी समोर आलीये.
Balasaheb Thorat यांनी मौन सोडलं! तांबेंचं अभिनंदन करत म्हणाले, ‘जे झालं ते…’