आर्यनसोबत सेल्फी पडू शकतो किरण गोसावीला महागात, होऊ शकते अटकेची कारवाई; जाणून घ्या कसं…
मुंबईतील क्रुझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात NCB ने शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ आरोपींना अटक केली. आर्यन खानची आज १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतू या कारवाई दरम्यान आर्यन खान आणि अरबाजला NCB ऑफिसमध्ये घेऊन येणाऱ्या किरण गोसावी आणि भानुशाली या दोन व्यक्तींवरुन सध्या गदारोळ सुरु आहे. किरण गोसावीने तर आर्यन खानसोबत NCB ऑफिसमध्ये […]
ADVERTISEMENT
मुंबईतील क्रुझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात NCB ने शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह ८ आरोपींना अटक केली. आर्यन खानची आज १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतू या कारवाई दरम्यान आर्यन खान आणि अरबाजला NCB ऑफिसमध्ये घेऊन येणाऱ्या किरण गोसावी आणि भानुशाली या दोन व्यक्तींवरुन सध्या गदारोळ सुरु आहे. किरण गोसावीने तर आर्यन खानसोबत NCB ऑफिसमध्ये सेल्फीही घेतला.
ADVERTISEMENT
हाच सेल्फी किरण गोसावीला महागात पडण्याची शक्यता असून पुणे पोलिस त्याला अटक करण्याची शक्यता आहे.
Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश
हे वाचलं का?
किरण गोसावी आणि भानुशाली हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी केला होता. किरण गोसावीविरुद्ध २०१८ साली पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हापासून पुणे पोलीस गोसावीच्या शोधात आहेत. पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या एका तरुणाकडून गोसावीने मलेशियात नोकरी लावून देतो असं अमिष दाखवून ३ लाख रुपये उकळले होते.
चिन्मयने हे पैसे गोसावीला दिले, ज्यानंतर त्याला मलेशियात पाठवण्यातही आलं. परंतू मलेशियाला पोहचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं चिन्मयला लक्षात आलं. चिन्मय यानंतर पुण्यात परत आला आणि त्याने किरण गोसावीकडे आपले पैसे परत मागितले, यावेळी गोसावीने चिन्मयला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चिन्मय देशमुखने पोलिसांत गोसावीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पुणे पोलीस गोसावीच्या शोधात होते, परंतू दरम्यानच्या काळात तो फरार झाला होता. परंतू आर्यन खानसोबतच्या सेल्फीनंतर किरण गोसावी पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT