सोमय्यांची बातमी खरी ठरली! सदानंद कदम यांना ईडीकडून अटक
मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दिवसभराच्या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कदम यांना ताब्यात घेतल्यानंतरच त्यांना अटक झाली […]
ADVERTISEMENT

मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर दिवसभराच्या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कदम यांना ताब्यात घेतल्यानंतरच त्यांना अटक झाली आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. सदानंद कदम हे शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (10 मार्च) ईडीच्या पथकाने सदानंद कदम यांना दापोलीतून त्यांना ताब्यात घेतलं होतं. यावेळी तिथे त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. मात्र, त्यानंतर सदानंद कदम यांना ईडीचं पथक थेट मुंबईकडे रवाना झालं. त्यानंतर मुंबईत ईडी कार्यालयात सदानंद कदम यांची चौकशी झाली. किरीट सोमय्यांनी असाही दावा केला आहे की, सदानंद कदम हे अनिल परब यांचे बिझनेसमधील भागीदार आहेत. त्यामुळे आता पुढचा नंबर हा अनिल परब यांचा असणार आहे.
साई रिसॉर्टसह अनिल परबांच्या 10कोटींच्या संपत्तीवर ED ची टाच
दापोली साई रिसॉर्ट प्रकरण काय?
अनिल परब यांचं रिसॉर्ट मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर होतं, त्याचा तपासही ईडीकडून करण्यात आला होता. याच रिसोर्टच्या आधारे ईडीने छापेमारी केली आहे, तसंच चौकशीही सुरू करण्यात आली होती.










