Kirit Somaiya: ‘जो बायकोचा नाही होऊ शकला तो महाराष्ट्राचा काय होणार?’, सोमय्यांची बोचरी टीका
मिथिलेश गुप्ता, कल्याण: ‘जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार?’, अशी जहरी टीका करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कल्याणमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात किरीट सोमय्या बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, कल्याण: ‘जो बायकोचा होऊ शकला नाही तो महाराष्ट्राचा काय होणार?’, अशी जहरी टीका करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कल्याणमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात किरीट सोमय्या बोलत होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 19 बंगल्याच्या प्रकरणात 2019 आणि 2021 साली ग्रामपंचायतींना दोन पत्रं लिहिली. यातल्या पहिल्या पत्रात 19 बंगले आमच्या नावावर करा, अशी मागणी करण्यात आली होती. तर दुसऱ्या पत्रात तिथे बंगले नव्हते, असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलं आहे. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
ही दोन्ही पत्रं दाखवत यावर उद्धव ठाकरे कालच्या सभेत का बोलले नाहीत? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसंच ही दोन पत्रं लिहिणाऱ्या दोन रश्मी ठाकरे आहेत का? की उद्धव ठाकरेंच्या दोन बायका आहेत का? की, एकाच रश्मी ठाकरेंनी दोन्ही पत्रं लिहिली आहेत? की उद्धव ठाकरेंनी ही पत्रं लिहिली आहेत? असे अनेक सवाल किरीट सोमय्या यांनी यावेळी विचारले आहेत.
याचवेळी बोलताना सोमय्या असंही म्हणाले की, ‘जो बायकोचा होऊ शकत नाही तो महाराष्ट्राचा काय होणार?’ अशी बोचरी टीका त्यांनी केली.