किरीट सोमय्यांना धक्काबुक्की; गृहमंत्र्यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
शिवसेना-भाजपतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं दिसत आहे. पुणे दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. कार्यकर्त्यांच्या गराड्यात आणि झटापटीत सोमय्या पायऱ्यांवर कोसळले. या घटनेवरून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घटनेच्या चौकशीची आदेश दिले असन, घटनेबद्दलही माहिती दिली. महाविकास आघाडीतील पक्षाच्या […]
ADVERTISEMENT

शिवसेना-भाजपतील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचं दिसत आहे. पुणे दौऱ्यावर असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. कार्यकर्त्यांच्या गराड्यात आणि झटापटीत सोमय्या पायऱ्यांवर कोसळले. या घटनेवरून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घटनेच्या चौकशीची आदेश दिले असन, घटनेबद्दलही माहिती दिली.
महाविकास आघाडीतील पक्षाच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर होते. महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी जात असतानाच शिवसैनिकांनी सोमय्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी धक्काबुक्कीही केली. भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत झटापट झाली. यावेळी सोमय्या मुख्य दारासमोरील पायऱ्यांवर कोसळले.
पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांना धक्काबुक्की, पायऱ्यांवर कोसळले सोमय्या
या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत. घटनेनंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत जशास तसे उत्तर देऊ शकतो, असा प्रत्यक्षपणे इशारा दिला. घटनेवरून राजकारण तापण्याची चिन्ह असून, त्यावर आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केलं आहे.