कोल्हापूर: 61 वर्षीय वासनांध सावकाराकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, पीडितेने दिला स्त्री अर्भकाला जन्म
दीपक सूर्यवंशी, हातकणंगले: कोल्हापूर तालुक्यातील हातकणंगले इथे एका 61 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. आता या प्रकरणी हातकणंगले येथील संशयित आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे याला पोलिसांनी अटक केली आहे. हातकणंगले इथल्या दर्गा चौक परिसरात आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. तो […]
ADVERTISEMENT
दीपक सूर्यवंशी, हातकणंगले: कोल्हापूर तालुक्यातील हातकणंगले इथे एका 61 वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. आता या प्रकरणी हातकणंगले येथील संशयित आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे याला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हातकणंगले इथल्या दर्गा चौक परिसरात आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. तो खाजगी सावकारी करतो. या सावकारीच्या माध्यमातून त्याची पीडित मुलीच्या कुटुंबाशी ओळख होती. पीडित मुलीवर अत्याचार करत असतानाही तो तिचा मानलेला मामा म्हणून समाजात वावरत होता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार अत्याचर केले.
आपल्या नवीन बांधकामावरील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन आरोपी पीडितेवर बलात्कार करत असे. पण यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर सांगली इथे उपचार सुरु होते. यातून तिने स्त्री अर्भकाला जन्म दिला. या सगळ्या प्रकारानंतर नातेवाईकांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती.
हे वाचलं का?
जी नुकतीच हातकणंगले पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. ही तक्रार प्राप्त होताच हातकणंगले पोलिसांनी नंदकुमार निगवे याला अटक केली. अटकेनंतर त्याला तात्काळ पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. याप्रकरणी कोर्टाने संशयित आरोपीला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यात 25 वर्षीय अभिनेत्रीवर तिघांनी केला बलात्कार; ब्ल्यू फिल्म तयार करण्याची धमकी
ADVERTISEMENT
नंदकुमार निगवे याने खाजगी सावकारीतून अनेकांवर अन्याय केले आहेत. त्याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद असून संतप्त ग्रामस्थांनी त्याची धिंडही काढली होती. पण असं असूनही आरोपी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता.
ADVERTISEMENT
त्यामुळे याप्रकरणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. एकीकडे स्थानिक या संपूर्ण घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असताना दुसरीकडे अन्याया विरुद्ध लढणाऱ्या संस्था, संघटना मात्र मूग गिळून गप्प असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT