लाल महाल लावणी : नृत्य केलेली जागा मराठा महासंघाने गोमूत्र आणि दुधाने केली स्वच्छ
पुण्यात शनिवारवाड्याच्या शेजारी असलेल्या लाल महाल या ऐतिहासिक वास्तूमध्ये जिजाऊंच्या पुतळ्यासमोर मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एका लावणी रिल्सचे शूट केले आहे. लावणीचा रिल्स सोशल मीडियावर येताच, राज्यातील शिवप्रेमीकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर ज्या व्यक्तीनी गाणे शूट केले आहेत. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली […]
ADVERTISEMENT
पुण्यात शनिवारवाड्याच्या शेजारी असलेल्या लाल महाल या ऐतिहासिक वास्तूमध्ये जिजाऊंच्या पुतळ्यासमोर मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी एका लावणी रिल्सचे शूट केले आहे. लावणीचा रिल्स सोशल मीडियावर येताच, राज्यातील शिवप्रेमीकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर ज्या व्यक्तीनी गाणे शूट केले आहेत.
ADVERTISEMENT
त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या सगळ्या वादानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुग्धभिषेक करण्यात आला. त्यानंतर ज्या ठिकाणी शूट झाले.त्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण देखील करण्यात आले.
हे वाचलं का?
काय आहे प्रकरण?
पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. लाल महालात चंद्रा या गाण्यावर वैष्णवी पाटील या महिला नृत्य कलाकाराने लावणी केली होती. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पुण्यातला लाल महाल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या लाल महालात शाहिस्तेखान थांबला होता तेव्हा त्याची बोटं छत्रपती शिवरायांनी छाटली होती. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने तमाशातल्या गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सिने दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी हे कृत्य केलं आहे. व्हीडिओत स्पष्ट दिसतं आहे की नृत्यांगना वैष्णवी पाटील ठुमके लगावत लावणीच्या तालावर लाल महालात नृत्य करते आहे. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकरणी वैष्णवी पाटीलने माफीही मागितली आहे.
काय म्हणाली आहे वैष्णवी पाटील?
“सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माझा नमस्कार. मी आज हे सांगू इच्छिते काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रेष्ठ असा जिजाऊ महाराजांच्या लाल महालात चंद्रा या गाण्यावर नाच करत आमचा एक व्हीडिओ केला होता. तो व्हीडिओ करत असताना माझ्या मनीध्यानीही काहीच आलं नव्हतं की यातून काही वाद निर्माण होईल. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातील, जनतेचं मन दुखावलं जाईल, भावना दुखावल्या जातील हे मनातही आलं नव्हतं. मात्र ही चूक माझ्याकडून झाली हे मला कळलं. त्याक्षणी मी तो व्हीडिओ डिलिट केला. पण तो खूप व्हायरल झाला होता. मी सर्वांना आज सांगते आहे की तो व्हीडिओ डिलिट करा. “
“जे मी केलं ती माझी चूक होती. मी सगळ्या जनतेची, शिवप्रेमींची सगळ्यांची हात जोडून माफी मागते. जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा माझा काहीही हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून ही चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते. मी सगळ्यांना वचन देते आहे की यापुढे माझ्याकडून कधीही अशी चूक होणार नाही.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT