गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह, आयसीयूमध्ये दाखल
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत असंही कळतं आहे. लता मंगेशकर यांच्या भाची रचना यांनी ANI ला ही माहिती दिली आहे.लता मंगेशकर यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She […]
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत असंही कळतं आहे. लता मंगेशकर यांच्या भाची रचना यांनी ANI ला ही माहिती दिली आहे.लता मंगेशकर यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI
(file photo) pic.twitter.com/8DR3P0qbIR
— ANI (@ANI) January 11, 2022
लता मंगेशकर यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली. आधी त्यांना घरीच उपचार करण्यात यावं असा सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यांचं वय लक्षात घेता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचं वय 92 आहे, त्यांना त्याचमुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतल्या पेडर रोड भागात असलेल्या प्रभू कुंजमध्ये लता मंगेशकर यांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानापासून काही मिनिटांवर असलेल्या ब्रीच कँडी रूग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल कऱण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
त्यांच्या वयोमानानुसार त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा आणि त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा अशी विनंती त्यांच्या नातेवाईकांनी सगळ्यांनाच केली आहे.
लता मंगेशकर या देशातील गानकोकिळा म्हणून ओळखल्या जातात. त्यांची सगळी गाणी सदाबहार आहेत. त्यांना प्रत्येक गायक आपला आदर्श मानतो. आज त्या 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला आहे. त्या दीनानाथ मंगेशकर यांची मोठी कन्या आहेत.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडिलांकडून गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली होती. परंतु वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. त्यांनी आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांना आईसारखं प्रेम दिलं आहे. सध्या चाहते त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT