विधान परिषद: Nana Patole यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले सत्यजीत तांबेंना..

मुंबई तक

Vidhan Parishad election Nana Patole reaction on Satyajeet Tambe: मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरुन (Nashik Vidhan Parishad Election) राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आहे. तर दुसरीकडे या सगळ्याला भाजपची (BJP) फूस असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) केला जात आहे. त्यामुळेच या मतदारसंघाकडे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Vidhan Parishad election Nana Patole reaction on Satyajeet Tambe: मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरुन (Nashik Vidhan Parishad Election) राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आहे. तर दुसरीकडे या सगळ्याला भाजपची (BJP) फूस असल्याचा आरोप काँग्रेसकडून (Congress) केला जात आहे. त्यामुळेच या मतदारसंघाकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. अशावेळी आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सत्यजीत तांबेंबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता यापुढे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार हे जवळजवळ स्पष्ट झालं आहे. (legislative council election nana patoles big statement said satyajeet tambe has no support from congress)

विधान परिषद निवडणुकीबाबत नेमकी काय भूमिका घेतली जावी यासाठी आज (18 जानेवारी) मुंबईत महाविकास आघाडीची एक बैठक पार होत आहे. त्याआधी माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘बंडखोराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही त्यामुळे सत्यजित तांबेंचा विषय संपला आहे.’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी ‘वाघीण’; कोण आहेत शुभांगी पाटील?

पाहा नाना पटोले नेमकं काय म्हणाले:

‘पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच विधान परिषदेच्या पाच जागांबाबतची आमची भूमिका उद्या स्पष्ट करू. यासंदर्भात महाविकास आघाडीचे तीनही पक्ष आज बैठकीत चर्चा करणार आहेत.’

हे वाचलं का?

    follow whatsapp