Mumbai Local: Train प्रवासाला परवानगी अन् डोंबिवली स्टेशनात पुन्हा गर्दी
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली कोरोना प्रतिबंधक लसीचे (Vaccine) दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल ट्रेननं (Local Train) प्रवास करायची मुभा मिळाली आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांचा लोकल प्रवास हा पुन्हा एकदा सुरु झाला आहे. रेल्वेची लोकल सेवा सुरु झाल्याने आता पुन्हा एकदा प्रवाशांची प्रचंड गर्दी आता रेल्वे स्थानकात दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) येथून मोठ्या […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली
ADVERTISEMENT
कोरोना प्रतिबंधक लसीचे (Vaccine) दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल ट्रेननं (Local Train) प्रवास करायची मुभा मिळाली आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांचा लोकल प्रवास हा पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
रेल्वेची लोकल सेवा सुरु झाल्याने आता पुन्हा एकदा प्रवाशांची प्रचंड गर्दी आता रेल्वे स्थानकात दिसून येत आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) येथून मोठ्या प्रमाणात नागरिक हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईच्या (Mumbai) दिशेने प्रवास करतात. त्यामु त्यामुळे आता या स्थानकांमध्ये पुन्हा एकदा लोकल पकडण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.
हे वाचलं का?
त्यातही जलद लोकलसाठी प्रवासी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. आज (16 ऑगस्ट) पतेतीची सुट्टी असून देखील डोंबिवली, दिवा, कल्याण व इतर स्टेशन परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
सध्या महाराष्ट्र सरकारने दोन डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच रेल्वे प्रवासास परवानगी दिली आहे. याआधी फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकारने काही प्रमाणात लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
पण यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. काल आणि आज अशा दोन दिवसांच्या सुट्टीनंतर उद्या ही गर्दी वाढण्याची अधिक शक्यता आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी कोरोनाविषयी नियम म्हणजे मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणं हे गरजेचं आहे. मात्र, लोकल प्रवासादरम्यान या सगळ्याचा फज्जा उडत असल्याचं सध्या दिसत आहे.
लोकल सुरु करावी अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत होती. असं असताना सरकारने देखील लोकल प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात याचा कोरोना रुग्णसंख्या वाढीवर काही परिणाम होतो का? याकडे देखील शासनाचं लक्ष असणार आहे.
लोकल प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा विशेष पास असणं आवश्यक
दरम्यान, लोकल प्रवासासाठी सरकारने परवानगी जरी दिलेली असली तरी त्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा एक विशेष पास प्रवाशांकडे असणं आवश्यक आहे. जाणून घ्या हा पास आपण नेमका कसा मिळवू शकता.
-
सर्वात आधी https://epassmsdma.mahait.org ही लिंक ओपन करावी.
-
त्यानंतर या लिंकवर Travel Pass For Vaccinated Citizens यावर क्लिक करावं.
-
त्यानंतर नगारिकांनी आपला कोव्हिड लसीकरणासाठीचा मोबाईल क्रमांक नमूद करावा
-
यानंतर मोबाईल वर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) मेसेजद्वारे मिळेल.
-
ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील
-
त्यामध्ये जनरेट पास या पर्यायावर क्लिक करा
-
क्लिक केल्यानंतर कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक इत्यादी तपशील समोर दिसेल
-
या तपशिलामध्ये सेल्फ इमेज या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येऊ शकतं. मोबाईल कॅमेराद्वारे सेल्फी काढूनही फोटो अपलोड करता येईल
-
ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 48 तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पाससाठी मेसेजद्वारे लिंक मिळे
-
मोबाईलवर आलेली लिंक तिकिट खिडकीवर पास दाखवल्यानंतर पास मिळू शकेल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT