अमोल कोल्हेंविरूद्ध राष्ट्रवादीच्याच नेत्याने थोपटले दंड, शिरूरमध्ये लावले बॅनर्स
Shirur Loksabha Election Amol kolhe vs Vilas Lande : शरद पवार यांचे विश्वासू नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदाराचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आमदार लांडे यांनी खासदारकीसाठी दावा ठोकल्याची चर्चा आता शिरूर मतदार संघात रंगली आहे.
ADVERTISEMENT
Shirur Loksabha Election Amol kolhe vs Vilas Lande : राष्ट्रवादी कॉग्रेसने लोकसभेच्या निवडणूकीसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही देखील ठरवला जात आहे. या दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदाराचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आमदार लांडे (Vilas lande) यांनी खासदारकीसाठी दावा ठोकल्याची चर्चा आता शिरूर मतदार संघात रंगली आहे. शिरूर मतदार संघातून आधीच खासदार असलेले अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीचेच विलास लांडे यांचे आव्हान असणार आहे. या दोन्ही नेत्यांमुळे शरद पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यात आता या दोन्ही नेत्यांमधून शिरूर मतदार संघातून कोणत्या नेत्यांची वर्णी लागते? हे पाहावे लागणार आहे. (loksabha election 2024 vilas lande claim on amol kolhe shirur loksabha constitution)
ADVERTISEMENT
2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे (Vilas lande) यांनी तयारी केली होती.मात्र ऐनवेळी अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. त्यामुळे विलास लांडे यांना माघार घ्यावी लागली होती. मात्र आता पुन्हा एकदा विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकला आहे. आज लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात भावी खासदार अशी बॅनरबाजी देखील करण्यात आली होती.या बॅनरबाजीतून विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकल्याचे बोलले जात आहे. 2009 पासूनच माझा या मतदारसंघात जनसंपर्क आहे. मी लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे. जर पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवणार आणि निवडून येणार, असा विश्वास देखील विलास लांडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : लोकसभा नको रे बाबा! नेत्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीसमोर नवा पेच?
अमोल कोल्हे काय म्हणाले?
विलास लांडे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे मला माध्यमातून कळाले. कुणालाही महत्वाकांक्षा असणे काही गैर नाही, त्यामुळे विलास लांडे यांना माझ्य़ाकडून मनपूर्वक शुभेच्छा असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. पण असे म्हणातात ना शर्यत अजून संपली नाही आणि मी अजून जिंकलो नाही, त्या पद्धतीने 2019 साली मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, तो गेल्या 4 वर्षात सार्थ ठरवलाय, असा विश्वास देखील कोल्हे यांनी व्यक्त केला. ही टर्म संपायला अजून अवधी शिल्लक आहे. त्यानुसार मतदारांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला होता, तो सार्थ ठरवण्यासाठी यापुढील काळातही मी कार्यरत असेन. आणि या संदर्भात शरद पवार जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, अशी भूमिका देखील कोल्हे यांनी मांडले आहे.
हे वाचलं का?
दरम्यान आता लोकसभेच्या एकाच जागेवरून दोन खासदारांनी दावा केल्यामुळे शऱद पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे. आता शिरूर मतदार संघातून नेमक्या कोणत्या नेत्यांची वर्णी लागते. हे आगामी लोकसभा निवडणूकी दरम्यान कळणार आहे.
हे ही वाचा : नामांतरावरून असाही गोंधळ! एकाच दिवशी अहमदनगरला मिळाली चार नवी नावं!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT