Loudspeakers Row : नियम मोडला, मुंबई पोलिसांनी दोन मशिदींविरुद्ध दाखल केला गुन्हा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भोंग्यांच्या वापराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकष ठरवून दिले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन मशिदींच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांनी वांद्रे येथील नुरानी मशीद आणि सांताक्रूझमधील लिंक रोडवर असलेल्या मुस्लीम कब्रस्तान मशिदीच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

“भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे बाळासाहेबांचं ऐकणार की नाही? राज यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

हे वाचलं का?

या प्रकरणाची माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितलं की, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंग्यांचा वापर केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. त्याबरोबर दिवसाही डेसिबल मर्यादेचं पालन करणं आवश्यक आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन वांद्रेतील नुरानी मशीद व्यवस्थापनाकडून पालन होत नसल्याचं आढळून आलं. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी कलम भादंवि १८८ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला.

ADVERTISEMENT

Loudspeaker Rules : भोंगे लावण्याबाबत कायदा काय सांगतो?, नियम मोडले तर काय आहे शिक्षा?

ADVERTISEMENT

पोलिसांतील सूत्रांनी सांगितलं की, गुरुवारी पहाटे नुरानी मशिदीत भोंग्यांवरून अजान दिली गेली. सकाळी ६ वाजेच्या आधीच भोंग्यांचा वापर केला गेला. त्यानंतर दुपारच्या अजान वेळी डेसिबल मर्यादेचे पालन केले गेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन झालं.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेत मशिदीला भेट दिली आणि त्यानंतर भोंगे आणि साहित्य जप्त केलं. दुसऱ्या घटनेत मुंबईतीलच सांताक्रूझ पोलिसांनी एक गुन्हा दाखल केला. लिंक रोडवरील कब्रस्तान मशिदीशी संबंधित असलेल्या नागरिकांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि..’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं होतं. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील धार्मिक स्थळांच्या प्रमुखांची बैठक घेतली होती.

याच बैठकीत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. त्याचबरोबर भोंगे वापरण्यासाठी तशी परवानगी घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. याच बैठकीत नियमांचा भंग झाल्यानंतर कुणी तक्रार केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सातत्याने त्यांच्याकडून या मुद्द्यावर जोर दिला जात आहे. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवले जात नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन होत नाही, तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडलेली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT