loudspeaker: “महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त…”; ठाकरेंनी केलं योगींचं कौतुक

मुंबई तक

उत्तर प्रदेशात सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रार्थना स्थळावरील अनधिकृत भोंगे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर इतर प्रार्थना स्थळांकडून भोंग्यांचा आवाज कमी केला आहे. या निर्णयाबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. ३ मे पर्यंत भोंग्यांसंदर्भातील […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उत्तर प्रदेशात सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रार्थना स्थळावरील अनधिकृत भोंगे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर इतर प्रार्थना स्थळांकडून भोंग्यांचा आवाज कमी केला आहे. या निर्णयाबद्दल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. ३ मे पर्यंत भोंग्यांसंदर्भातील निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटही राज यांनी राज्य सरकारला दिलेला आहे. भोंगा वाजल्यास त्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारी मनसेकडून दिलेला असून, यावरून वाद विवाद झडत आहे.

दरम्यान, राज्यात हा मुद्दा चर्चेत असतानाच उत्तर प्रदेशातही भोंग्यांच्या मुद्द्याची चर्चा होत आहे. झालं असं की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने उत्तर प्रदेशातील अनधिकृत भोंगे हटवण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर प्रार्थनास्थळांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच कमी आवाज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

Loudspeaker Rules : भोंगे लावण्याबाबत कायदा काय सांगतो?, नियम मोडले तर काय आहे शिक्षा?

हे वाचलं का?

    follow whatsapp