मराठमोळा साज, खुललं माधुरीचं मधुर सौंदर्य!
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची भुरळ आजही कायम आहे. त्यातही तिचा मराठमोळा साज हा तिचं सौंदर्य अधिक खुलवतं. काही दिवसांपूर्वीच माधुरीने आपले मराठमोळ्या साजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जे आता व्हायरल होत आहेत. फिकट हिरव्या रंगाची पैठणी परिधान केलेली माधुरी या लूकमध्ये फारच सुंदर दिसते आहे. तिच्या या मराठमोळ्या साजावर तिचे चाहते […]

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या सौंदर्याची भुरळ आजही कायम आहे. त्यातही तिचा मराठमोळा साज हा तिचं सौंदर्य अधिक खुलवतं.
काही दिवसांपूर्वीच माधुरीने आपले मराठमोळ्या साजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. जे आता व्हायरल होत आहेत.
फिकट हिरव्या रंगाची पैठणी परिधान केलेली माधुरी या लूकमध्ये फारच सुंदर दिसते आहे. तिच्या या मराठमोळ्या साजावर तिचे चाहते देखील भाळले आहेत.
माधुरी ही आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.
आतापर्यंत अनेकदा माधुरीने साडीमधील आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्याला चाहत्यांकडून देखील पसंती मिळत आली आहे.
बॉलिवूडमध्ये राहून देखील माधुरीने कधीच आपलं मराठीपण सोडलेलं नाही. तिच्या वावरण्यात तिने ते नेहमीच दाखवूनही दिलंय.
लग्नानंतर अनेक वर्ष माधुरी ही अमेरिकेत वास्तव्यास होती. मात्र तिथे राहून देखील तिने आपलं मराठीपण जपलं.
पारंपारिक वेशभूषा करणं हे माधुरीला नेहमीच आवडतं. अशा वेशभूषेतील फोटो देखील ती आपल्या इंस्टा अकाउंटवर शेअर करते.
बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर माधुरी सध्या छोट्या पडद्यावरील काही रियालिटी शोकडे वळली आहे.