महिलांचे व्हिडीओ काढायचं व्यसन, सिंहगड एक्स्प्रेसमध्ये मदरसा शिक्षकाला पकडलं रंगेहाथ

मुंबई तक

ADVERTISEMENT

madrasah teacher caught red handed in sinhagad express addicted to making videos of women
madrasah teacher caught red handed in sinhagad express addicted to making videos of women
social share
google news

कल्याण : कल्याणमधून (Kalyan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, धावत्या सिंहगड एक्सप्रेसमध्ये (Singhgad एक व्यक्ती महिलांचे व्हिडीओ आणि फोटो काढत होताय ही बाब काही प्रवाशांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे हाच व्यक्ती बुधवारी देखील अशाच पद्धतीने महिलांचे व्हिडीओ काढून त्यांना छेडण्याचा प्रयत्न करत होता. गुरुवारी मात्र त्याला प्रवाशांनी चांगलाच इंगा दाखवला. (madrasah teacher caught red handed in sinhagad express addicted to making videos of women)

ADVERTISEMENT

व्हिडीओ काढणाऱ्या या वासनांध व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी महिलांनी देखील बराच आरडाओरडा केला. हा सर्व प्रकार धावत्या सिंहगड एक्प्रेसमध्ये सुरू होता. गाडी बदलापूरहून अंबरनाथच्या दिशेने पुढे जात होती. त्यामुळे काही प्रवाशांनी ही बाब कल्याण जीआरपीला कळवली. त्यानंतर कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी क्षणाचाही विलंब न करता कल्याण रेल्वे स्थनाकात जीआरपीची टीम रवाना केली आणि कल्याण रेल्वे स्थानकात गाडी येताच पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतलं.

अधिक वाचा – पुण्यात क्रूर कांड, अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध? दिराने पळवून आणलं अन् नंतर वहिनीलाच…

पुढील चौकशी करत या इसमावर कलम 354 ड आणि पॉक्सो कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीचं नाव मोहम्मद अश्रफ असं असल्याचं समजतं आहे. अश्रफ बिहारच्या रहिवासी असून सीतामढीच्या एका मदरसेमध्ये शिक्षक म्हणून काम करीत होता. अश्रफ पुणेहुन मुंबई येत असताना अशाप्रकारचं विचित्र कृत्य करत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर एक्सप्रेसमधील सजग प्रवाशांनी या आरोपीला रंगेहाथ पकडल्याने त्याचं कृत्य उघडकीस आलं.ॉ

हे वाचलं का?

अधिक वाचा – अ‍ॅडल्ट वेबसाईटवर फोटो लीक करण्याची धमकी, ‘कला’ फेम अभिनेत्रीचा गंभीर आरोप

आता या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कल्याण जीआरपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली आहे.

दरम्यान, लोकल ट्रेन आणि एक्सप्रेसमध्ये असे प्रकार मागील काही महिन्यांपासून सर्रास होत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे महिला वर्गात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT