महाराष्ट्राने CM म्हणून शिंदेंना स्वीकारलं?, काय आहे Mood Of the Nation

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra accepted eknath shinde as chief minister mood of the nation survey: मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) साधारण सहा महिन्यांपूर्वी अतिशय नाट्यमयरित्या सत्तांतर घडून आलं. तसंच तेवढ्याच नाट्यमरित्या मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) माळही शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गळ्यात पडली. पण आता सहा महिन्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे नेमके कितव्या स्थानी आहेत आणि त्यांना राज्यातील जनता किती पसंती देते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने स्वीकारलंय का? असा सवालच India Today-C Voter ने केलेल्या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. ज्यामध्ये नेमकं जनतेने काय म्हटलंय हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (maharashtra accepted eknath shinde as chief minister what is said in mood of the nation survey india today c voter)

ADVERTISEMENT

जेव्हा आपण फक्त महाराष्ट्रातील जनतेला हा प्रश्न विचारला की, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदे हे कितव्या स्थानी असावेत. तर त्यात टॉप 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे हे दिसून आलेले नाहीत. म्हणजे त्यांच्याच राज्यामध्ये.. ज्यांच्यावर विसंबून भाजप आपली सगळी व्यूहरचना करतेय. कारण त्यांचं यश हे या युतीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊयात या सर्व्हेमध्ये राज्यातील लोकांनी नेमकं काय म्हटलं आहे.

Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

हे वाचलं का?

Most Popular CM (in Home State)

यामध्ये पहिल्या स्थानी ओडिशाचे नवीन पटनायक हे आहे. ज्यांना 73.2 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

ADVERTISEMENT

पाहा मुख्यमंत्र्यांबाबत लोकांनी दिलेली पसंती, संपूर्ण यादी:

1. नवीन पटनायक (ओडिशा) – 73.2 टक्के लोकांची पसंती

ADVERTISEMENT

2. अरविंद केजरीवाल (दिल्ली)- 69.2 टक्के लोकांची पसंती

3. हेमंत बिस्वा सरमा (आसाम) – 68.3 टक्के लोकांची पसंती

4. भूपेश बघेल (छत्तीसगड) – 55.7 टक्के लोकांची पसंती

5. शिवराज सिंह चौहान (मध्यप्रदेश) – 54.7 टक्के लोकांची पसंती

6. पुष्कर धामी (उत्तराखंड) – 53.4 टक्के लोकांची पसंती

7. योगी आदित्यनाथ (उत्तरप्रदेश) – 48.6 टक्के लोकांची पसंती

8. M.K. स्टॅलिन (तामिळनाडू) – 45.7 टक्के लोकांची पसंती

9. भूपेंद्र पटेल (गुजरात) – 43.6 टक्के लोकांची पसंती

10. YS जगन मोहन रेड्डी (आंध्रप्रदेश) – 39.7 टक्के लोकांची पसंती

Mood of the Nation: भारत जोडो यात्रा मोदींच्या सत्तेला सुरुंग लावेल का?

महाराष्ट्रातील जनतेच्या मते लोकप्रिय मुख्यमंत्र्यामध्ये एकनाथ शिंदे कितवे?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील जनतेच्या मते एकनाथ शिंदे हे टॉप 10 मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाहीत. म्हणजेच सर्व्हेनुसार, अद्याप तरी मुख्यमंत्री शिंदे हे फारसे लोकप्रिय नाहीत.

याचाच अर्थ स्वत:च्या राज्यात एकनाथ शिंदे यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून फार मोठी पसंती दिलेली नाही. कारण या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे टॉप 10 मध्ये देखील येऊ शकलेले नाहीत.

आता या सगळ्या सर्व्हेचा भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसा विचार करतं आणि निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT