Aditya Thackeray : ‘मविआ’ने ६.५ लाख कोटींची गुंतवणूक आणली; पुरावेही देणार : आदित्य ठाकरेंचे उत्तर
मुंबई : महाविकास आघाडीने राज्यात किती उद्योग, गुंतवणूक आणली, किती रोजगार निर्माण केले याची आकडेवारी द्यावी असं आव्हान भाजपकडून देण्यात आलं होतं. यावर बोलताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला प्रत्यूत्तर दिले. महाविकास आघाडीने दावोसमध्ये ८० हजार कोटी असतील किंवा अडीच वर्षांमध्ये जवळपास साडेसहा कोटींची गुंतवणूक आणली. याचे […]
ADVERTISEMENT
मुंबई : महाविकास आघाडीने राज्यात किती उद्योग, गुंतवणूक आणली, किती रोजगार निर्माण केले याची आकडेवारी द्यावी असं आव्हान भाजपकडून देण्यात आलं होतं. यावर बोलताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला प्रत्यूत्तर दिले.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीने दावोसमध्ये ८० हजार कोटी असतील किंवा अडीच वर्षांमध्ये जवळपास साडेसहा कोटींची गुंतवणूक आणली. याचे पुरावे आणि आकडेवारीही लवकरच देऊ असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
टाटा ए्अरबस हा २२ हजार कोटीचा प्रकल्प आहे. आदीत्य ठाकरे म्हणतायत महाविकास आघाडी सरकारच्या काळात ६ लाख कोटीची गुंतवणूक आणली.
बावळटपणाचा कडेलोट, सहा लाख कोटी म्हणजे सहावर किती शून्य हे तरी त्यांना माहीत आहे का? तुम्ही नाईट लाईफ आणि पेग्विनवर बोला तेवढाच विषय तुम्हाला झेपणारा आहे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 29, 2022
हे वाचलं का?
६ लाख कोटी गुंतवणुकीचा तपशील द्यावा, नाही तर पोगो बघण्या इतपतच वकूब असल्याचे मान्य करावे.
गुंतवणूक आणणे वाझे पाळून वसुली करण्या इतके सोपे नसते.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 29, 2022
माझी मजा उडावताय, पण तुम्ही महाराष्ट्राला मागे घेऊन जाताय :
टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची छोटा पप्पू म्हणतं खिल्ली उडवली होती. आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारमुळे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचा आरोप केला होता. यावर संभ्रमाचं वातावरण बनवायचं राजकारण केलं तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल, हे सर्वांना माहिती आहे”, असं सत्तार म्हणाले होते.
ADVERTISEMENT
यावर आदित्य ठाकरे यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही माझी मजा उडवताय, मला नावं ठेवताय, ठीक आहे, पण महाराष्ट्राला तुम्ही मागे नेताय, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले.
ADVERTISEMENT
उद्योग मंत्री, कृषीमंत्र्यांचे राजीनामा घेणार का?
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे राजीनामे घेणार का? असा सवाल केला. ते म्हणाले, एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे आणि एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आपल्या राज्याला फटका बसत आहे. शिंदे सरकार फक्त राजकारण करत आहे. कोणताही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण हे देखील माहिती नाही. कृषीमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत वेगळ्या कार्यक्रमासाठी बसायचे असते. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. अशा परिस्थितीत कृषीमंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल त्यांनी केला.
एका बाजूला शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असताना उद्योगांसाठीही महाराष्ट्र सुरक्षित नाही. आज चौथा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक प्रकल्प राज्यासाठी आम्ही आणले होते. मात्र, आता हे घटनाबाह्य सरकार आल्यावर या डबल इंजिन सरकारमधील एक इंजिन फेल झाले आहे. त्यामुळे या राज्यात येणारी गुंतवणूक आता राज्याबाहेर जात आहे. त्यामुळे आता राज्यातील एवढे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर तुम्ही उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का, असा सवालही त्यांनी सरकारला केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT