shraddha walker : भाजप आमदारांच्या आरोपांची देवेंद्र फडणवीसांनीच काढली हवा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर : संपूर्ण देशात गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचे आज (मंगळवारी) विधानसभेत पडसाद उमटले. श्रद्धा वालकर हिने तुळींज पोलीस स्थानकात केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली गेली नाही, तसंच तिने अर्जही मागे घेतला, या प्रकरणी राजकीय दबाव होता का? असा सवाल करत भाजप आमदार अतुल भातखळकर आणि आशिष शेलार आक्रमक झाले. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धा वालकरने तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या अर्जात, आफताब तुकडे तुकडे करून फेकून देईन अशी धमकी देत असल्याचा उल्लेख श्रद्धाने केला होता. तिने म्हटलेलं की, आफताब अमीन पूनावाला हा मला शिवीगाळ करून मारहाण करतो. आज त्याने गळा दाबून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक महिन्याच्या अंतराने श्रद्धा वालकर हिने आपली काहीही तक्रार नसल्याचं म्हणतं तक्रार अर्ज मागे घेतला. याच प्रकरणावरुन आज विधानसभेत तीव्र पडसाद उमटले.

काय घडलं विधानसभेत?

श्रद्धा वालकर तक्रार अर्जावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तसंच श्रद्धाने जो तक्रार अर्ज दिला होता तो मागे घेण्यामागे त्यावेळच्या सरकारमधील नेतृत्वाचा दबाव होता का? तो दबाव पोलीसांवर होता का? असा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आदेश दिले जातील का? असा सवाल विचारला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भातखळकरांच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, श्रद्धा वालकर हे प्रकरण मानवतेला काळिमा फासणारं आहे. माझी आणि तिच्या वडीलांची भेट झाली. मी सगळा घटनाक्रम समजून घेतला. ही केस दिल्लीमध्ये घडली असल्याने दिल्ली पोलीस तपास करत आहेत. अद्याप पर्यंतच्या तपासामध्ये कोणत्याही राजकीय किंवा बाहेरच्या व्यक्तीचा दबाव आढळून आलेला नाही. तथापि तिने तक्रार परत का घेतली याची चौकशी आपण करत आहोत.

ती तक्रार तिने साध्या मनाने मागे घेतलेली नाही हे निश्चित. त्याचप्रमाणे तिने तक्रार करणं आणि तक्रार मागे घेणं यात एका महिन्याचं अंतर आहे. या दरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली? थोडी त्याची दखल घेतली असती तर अशा प्रकारची घटना टाळता आली असती. असं म्हणून फडणवीस यांनी अशा प्रकारच्या घटना पुढील काळात घडू नये यासाठी आपण डीजींच्या मार्फत सर्व पोलिसांना निर्देश दिले असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

यानंतर आशिष शेलार यांनी आक्रमक होतं श्रद्धाने दिलेल्या तक्रार अर्जात मारहाण झाली होती, असं सांगितलं होतं. मग तरीही पोलिसांनी एक महिना काहीच कारवाई का केली नाही? असा सवाल विचारला. या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याची आक्रमक मागणी त्यांनी केली. शेलार यांच्या मागणीला प्रतिसाद देत फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करत असल्याची घोषणा केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT