Maharashtra Bandh: मुंबईत ‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट, 8 ठिकाणी फोडल्या BEST बस
मुंबई: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence)घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज (11 ऑक्टोबर) महाराष्ट्रात बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांनी हा बंद पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष संयुक्तपणे निषेध नोंदवून आंदोलन करत आहेत. या […]
ADVERTISEMENT
मुंबई: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence)घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज (11 ऑक्टोबर) महाराष्ट्रात बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांनी हा बंद पुकारला आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष संयुक्तपणे निषेध नोंदवून आंदोलन करत आहेत. या सगळ्या दरम्यान, महाराष्ट्रात बंदचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. तसेच, मुंबईच्या विविध भागात आतापर्यंत आठ बेस्ट (BEST)बसेसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बंद आंदोलनातील आतापर्यंतची चांगली बातमी म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन आणि इतर रेल्वे याच्यावर या बंदचा काहीही परिणाम झालेला नाही. रेल्वेच्या सर्व सेवा त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरु आहेत.
हे वाचलं का?
पण मुंबईतील बेस्ट बसवर मात्र बंदचा परिणाम दिसून येत आहे. बेस्टवर शिवसेना युनियनचे वर्चस्व आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदचा त्यावर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. पण यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज मुंबईत फारच तुरळक बेस्ट बस या रस्त्यावर धावताना दिसल्या. त्यातही जवळजवळ 8 बसेसचे तोडफोड करण्यात आल्याने बरंच नुकसान झालं आहे.
Maharashtra: BEST says eight of its buses were vandalised in different areas of Mumbai between midnight and 8 am today; seeks police protection
— ANI (@ANI) October 11, 2021
दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. मुंबईत सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे. पण काही ठिकाणी रॅली काढण्यात आल्याने थोड्या फार प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मात्र, यावेळी मुंबईतील इतर दुकानं आणि आस्थापनं बंद आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Bandh Live Updates:
महाविकास आघाडीचा ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन कसं आहे सुरु?
ADVERTISEMENT
लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. याच घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेसह सत्तेत असणाऱ्या तीनही पक्षांनी हा बंद पुकारला आहे.
लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही सांगण्यात येत आहे. सोमवारी व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT