महाराष्ट्र बंद: ‘सामना’तून वरुण गांधींचं कौतुक, भाजपवर टीकेची झोड

मुंबई तक

मुंबई: लखीमपूर-खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. अशावेळी शिवसेनेने आपलं मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर प्रचंड टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार वरुण गांधी यांचं मात्र बरंच कौतुक केलं आहे. ‘भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला? भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: लखीमपूर-खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. अशावेळी शिवसेनेने आपलं मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर प्रचंड टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार वरुण गांधी यांचं मात्र बरंच कौतुक केलं आहे.

‘भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला? भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद. त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला. शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली. वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे. एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही.’ अशा शब्दात सामनातून वरुण गांधी यांचं कौतुक केलं. पण आजच्या संपूर्ण अग्रलेखातून भाजपवर मात्र टीकेची झोड उठविण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणेच आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करु शकले नाहीत, अशा सगळ्यांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य ठामपणे उभे आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp