दहावी-बारावीच्या परीक्षा होणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हर्षदा परब

ADVERTISEMENT

कोरोनाचे रुग्ण वाढले असले तरी दहावी बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच या परीक्षा होणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंडळाने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केल्यानुसार बारावीची परिक्षा 23 एप्रिल ते 21 मे होणार आहे. तर, दहावीची परिक्षा 29 एप्रिल ते 20 मे होणार आहे. याच वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. या परीक्षा ऑफलाईनच घेणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

हे वाचलं का?

यावेळी त्यांनी बोलतना दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी शिक्षण मंडळावर परीक्षा घेण्यासाठी आणि परीक्षा न घेण्यासाठी असा दोन्ही बाजूने दबाव आहे. वर्षा गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार परीक्षा न घेण्यासाठी शहरी भागातून दबाव आहे. विशेषत: मुंबई आणि ठाणे परीसरातून काही विशिष्ट माणसं यासाठी दबाव टाकत असल्याचं प्राथमिक निरीक्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच दुसरा एक गट आहे जे परिक्षा लवकरात लवकर घ्याव्यात यासाठीही मागणी करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

या परीक्षा सुरक्षित पद्धतीने कशा घेता येतील याबाबत विभागातील अधिकरी विचार करत आहेत. याआधी ऑक्टोबरच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऐन कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात परीक्षा घेण्याचा अनुभव कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आहे. ज्याचा उपयोग दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत तयारी करताना नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

राज्यात काही ठिकाणी ग्रामिण भागात 9 वी 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. काही दिवसांपूर्वी सोलापूर आणि वाशिम या भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यावर बोलताना या दोन्ही ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं त्या म्हणाल्या. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना झाला नव्हता असं त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT