लाइव्ह

Marathi News Live : शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा 'राष्ट्रवादी'बद्दल मोठा दिलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar gets NCP symbol: Maharashtra Deputy CM is planning to address a meeting with the ministers of NCP and some MLAs at his official residence
Ajit Pawar gets NCP symbol: Maharashtra Deputy CM is planning to address a meeting with the ministers of NCP and some MLAs at his official residence
social share
google news

Maharashtra Politics Lok Sabha 2024 Maha yuti Maha vikas aghadi : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात वेगाने घडामोडी सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय काम सुरू केले आहे. राजकीय वर्तुळातील बेरजेच्या आणि तोडाफोडीच्या राजकारणाबरोबरच महाराष्ट्रातील इतर घटनांचे ताजे अपडेट वाचा...

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

  • 05:29 PM • 19 Feb 2024

    शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा 'राष्ट्रवादी'बद्दल मोठा दिलासा

    केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल निर्णय दिला. अजित पवार गटाला राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह आयोगाने दिले. या निकालाला शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने एक मोठा दिलासा शरद पवारांना दिला. 

    केंद्रीय निवडणूक आयोगाने शऱद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे पक्ष नाव दिले आहे. पुढील आदेश देईपर्यंत शरद पवार गटाला नाव देणारा निवडणूक आयोगाचा निर्णय लागू राहील, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. याचिकाकर्ता निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात आणि अर्ज दाखल केल्यानंतर एका आठवड्यात त्यांना चिन्ह द्यावं, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

  • 04:13 PM • 19 Feb 2024

    सुप्रिया सुळेंवर विखे पाटलांचा पलटवार

    सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, "तुम्ही माझं ट्विटर आज ही चेक करा. मी सातत्याने पीयूष गोयल यांना विनंती करतेय की एक धोरण ठरवा. सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी भरडला जातोय." सुप्रिया सुळेंनी असं म्हणत कांदा निर्यात बंदीवरून मोदी सरकारला घेरलं. त्यांच्या या टीकेला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उत्तर दिले. 

    राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याला मी महत्व देत नाही. त्यांचे वडील अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. शेती मालाच्या भावाला स्थिरता यावी म्हणून त्यांनी काय प्रयत्न केले ते सांगावं. सूचना करणं सोपं आहे. मात्र जेव्हा सत्तेत असताना संधी होती; त्यावेळी मात्र शेतकरी दिसला नाही. आता भारत सरकारने आमची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील निर्यात बंदी उठविण्यासाठी प्रयत्नशील होते. यापुढे दलालांमार्फत खरेदी पेक्षा शेतकऱ्यांना थेट कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्याचा सरकारचा विचार सुरू आहे", असे विखे पाटील म्हणाले.

  • 02:35 PM • 19 Feb 2024

    शिवसेना खासदार गोडसेंचा दिल्लीत भीषण अपघात

    शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने हेमंत गोडसे हे अपघातातून बचावले आहे. त्यांच्या कारचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. खासदार हेमंत गोडसे दिल्लीतील बी डी मार्गावरुन जात होते. ते इनोव्हा (MH 15 FC 9909) गाडीने प्रवास करत होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका (डीएल 7CW 2202) गाडीने जोरदार धडक दिली.

  • 01:32 PM • 19 Feb 2024

    कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयानंतर कांद्याच्या बाजार भावात वाढ

    लासलगाव (नाशिक)- कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयानंतर कांद्याच्या बाजार भावात तेजी पहायला मिळतेय. शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी 661 रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याला 2 हजार 100 रुपयांचा बाजार भाव मिळाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 300 वाहनातून कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त 2101, कमीतकमी 1000 रुपये तर सरासरी 1800 रुपये भाव मिळाला.

  • ADVERTISEMENT

  • 01:20 PM • 19 Feb 2024

    'निवडणूक आयोगाच्या कामावर...'; राज ठाकरेंचे शिक्षकांना आवाहन!

    'शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी बोलावतात मग, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतं? शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक भेटण्यासाठी आले होते. पहिले ते चौथीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला बोलावलंय. निवडणूक तोंडावर आल्या की घाईघाईनं काम का करावं. पालिकेच्या 4,136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला बोलावलं. लवकरच निवडणूक आयोगासोबत आमचे नेते बैठक घेतील. निवडणुकांच्या कामांसाठी शिक्षकांऐवजी नवीन लोक नियुक्त करावे. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामावर रूजू होऊ नये,' असं राज ठाकरेंनी शिक्षकांना आवाहन केलं.

  • 01:06 PM • 19 Feb 2024

    राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले... 

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनाही निवडणुकींच्या कामासाठी हजर होण्यास सांगण्यात आले आहे. हजारो शिक्षकांना तसे आदेश देण्यात आले असून, हजर न राहिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. शिक्षकांनी हजर होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच कोण कारवाई करतो, हे बघतोच असंही ते म्हणालेत.

  • ADVERTISEMENT

  • 12:56 PM • 19 Feb 2024

    भाजप नेत्याच्या संपर्कात असल्याबद्दल जयंत पाटील काय बोलले?

    भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार एकसंध आहे. शरद पवारांच्या जवळचा बडा नेता म्हणून येणाऱ्या बातम्या केवळ अफवाच आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम करण्याचा प्रयत्न आहे", असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

  • 12:42 PM • 19 Feb 2024

    राज ठाकरे-शेलारांमध्ये तासभर चर्चा

    काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह तीन नेत्यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 

    याच शासकीय निवासस्थानी या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरेंची मनसे महायुतीत सामील होणार अशी चर्चा सुरू झाली. 

    त्यानंतर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा निरोप शेलारांनी राज ठाकरेंना पोहोचवला असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनसे महायुतीत जाणार या चर्चेला बळू लागलं आहे. 

    मुंबईमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जास्त ताकद लावावी लागणार आहे. त्याच दृष्टीने भाजप मनसेला मुंबईत सोबत घेण्याच्या विचारात आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT