Maharashtra Flood : धीर सोडू नका! सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी -उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत, मात्र आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागरिकांनी धीर सोडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना केलं आहे.

ADVERTISEMENT

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.

Chiplun Flood : चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात, पालिका पाठवणार तीन विभागांना नोटीस

हे वाचलं का?

कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीने सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला केल्या आहेत.

Gulab Cyclone : गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात पूर; महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात रेड अलर्ट

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून, या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा, असं सांगितलं.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी (२८ सप्टेंबर) आणि आज (२९ सप्टेंबर) सकाळी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.

नुकसानीचे पंचनामे सुरू करा

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका

निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहचावा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.

हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले

यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर , औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टर ने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतलां आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

Cyclone Gulab : मराठवाड्यात हाहाकार! नद्यांचा रौद्रवतार, धरणं तुडुंब; मदतकार्याला वेग

एनडीआरएफ बचाव कार्यात

एनडीआरएफचे १ पथक उस्मानाबाद आणि १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT