महाराष्ट्रात कोरोना आता दहापट वेगाने पसरतोय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातल्या कोरोनाचा विचार केला तर इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्राची कोरोनाची स्थिती दिवसें दिवस अधिकच चिंताजनक व्हायला लागली आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या तुलनेत आता कोरोना दहापट जास्त वेगाने पसरतोय. महाराष्ट्राचा डबलिंग रेट फेब्रुवारीत 500 दिवसांवर होता तो आता 53 दिवसांवर आलाय. त्यामुळे आता 1 फेब्रवारी ते 30 मार्च या कालावधीत या डबलिंग रेटमध्ये कसा बदल होत गेला, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने किती गंभीर बाब आहे हे जाणून घेऊया..

डबलिंग रेट म्हणजे काय?

सगळ्यात पहिले डबलिंग रेट म्हणजे कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस. मागील 7 दिवसांच्या रुग्णसंख्येच्या आधारावर हा डबलिंग रेट मोजला जातो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या डबलिंग रेटमध्ये कसा फरक पडत गेला?

ADVERTISEMENT

आता महाराष्ट्राच्या डबलिंग रेटचा विचार केला तर, 1 फेब्रुवारीला राज्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस 566 इतके होते. त्या दिवशी महाराष्ट्रात 1, 948 नवे रुग्ण आढळले होते. मात्र त्यानंतर मधल्या काळात महाराष्ट्रात झपाट्याने रुग्णसंख्या वाढू लागली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर कोरोनाने महाराष्ट्रात पुन्हा नव्याने हातपाय पसरायला सुरूवात केली, त्यामुळे मार्चमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस 566 वरून 190 इतके झाले. 1 मार्चच्या दिवशी राज्यात 15, 510 नवे रुग्ण आढळलेले. त्यानंतर आता 30 मार्चला महाराष्ट्रातली कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस 53 दिवसांवर आले आहेत. म्हणजे केवळ एका महिन्याच्या कालावधीत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस म्हणजे डबलिंग रेट इतका कमी झालाय.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आत्ता 27.46 लाख सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी म्हणजे 29 मार्चलाही राज्यात 27, 918 कोरोना रुग्ण आढळलेत. महाराष्ट्राची रुग्णवाढीची सरासरी म्हणजे अव्हरेज ग्रोथ 23 टक्के इतकी आहे. मुंबई खालोखाल पंजाबची ही टक्केवारी सर्वाधिक आहे, पण तीही 8.82 टक्के इतकीच आहे. कुठे 23 टक्के आणि कुठे 8.82 टक्के. त्यामुळे आता मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये राज्यात कोरोनाची जी गंभीर स्थिती होती, तिच स्थिती आता पुन्हा येताना दिसतीय. त्यामुळे देशातल्या इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राने आता तरी कोरोनाला गांभिर्यानं घ्यायची गरज आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT