Maharashtra Covid : राज्यात कोरोना फोफावतोय! दिवसभरात आढळले ४६ हजारांहून अधिक रुग्ण
एकीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घट असतानाच राज्यातील इतर भागात मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्यात १८ आणि १९ जानेवारी रोजी आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत राज्यात कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज ४६ हजार १९७ कोरोना बाधित आढळून आले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात ५२ हजार २५ […]
ADVERTISEMENT

एकीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घट असतानाच राज्यातील इतर भागात मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्यात १८ आणि १९ जानेवारी रोजी आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत राज्यात कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज ४६ हजार १९७ कोरोना बाधित आढळून आले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात ५२ हजार २५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ६९,६७,४३२ नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोरोना लसीमुळे तयार झालेली इम्युनिटी किती दिवसानंतर कमी होते?; भारतात करण्यात आला अभ्यास
दरम्यान, राज्यात आज ३७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या १.९२ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत ७,२७,४५,३४८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७३,७१,७५७ (१०.१३ टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात २४,२१,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३,३९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.