महाराष्ट्रात 3800 हून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 80 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 3841 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 63 लाख 28 हजार 561 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.09 टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आज दिवसभरात 80 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 3391 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 68 लाख 74 हजार 491 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 18 हजार 502 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 83 हजार 445 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1812 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 47 हजार 919 सक्रिय रूग्ण आहेत.

मुंबईत 485 नवे रूग्ण

हे वाचलं का?

मुंबईत कोरोनाचे 485 नवे रूग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात 432 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 14 हजार 424 रूग्ण मुंबईत बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आज घडीला 4739 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1276 दिवसांवर गेला आहे.

पुण्यात 175 नवे रूग्ण

ADVERTISEMENT

पुण्यात 175 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर आज 253 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात 1781 सक्रिय रूग्ण आहेत. तर दिवसभरात पुण्यात कोरोनामुळे 3 मृत्यूंची नोंद झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या वैज्ञानिकाने कोरोनाच्या तिसरी लाट कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाची तिसरी लाट जास्त घातक नसेल, असं प्रा. ज्ञानेश्वर चौबे यांनी म्हटलं आहे.

तिसरी लाट कधीपर्यंत येऊ शकते?

प्रा. चौबे यांनी यांच्या अंदाजाप्रमाणे कोरोनाची तिसरी लाट कमीत कमी तीन महिन्यानंतर येऊ शकते. तिसऱ्या लाटेला रोखण्यात लसीकरण मोहीम फायदेशीर ठरेल. कारण लस घेतलेल्या नागरिकांना आणि कोरोनातून बऱ्या झालेले लोक म्हणजेच प्रोटेक्टिव्ह ग्रुपमध्ये येणारे लोक सुरक्षित राहतील, असं चौबे यांनी म्हटलं आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेतही लहान मुलं सुरक्षित असतील, असं चौबे यांचं म्हणणं आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेतही लहान मुलं सुरक्षित असतील, असं चौबे यांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT