जॉन्सन बेबी पावडर सदोष, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने केला कंपनीचा परवाना कायमचा रद्द

मुंबई तक

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने उत्पादित केलेल्या जॉन्सन बेबी पावडर या सौंदर्य उत्पादनाचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी जॉन्सन बेबी पावडर देशभरात वापरली जाते. मात्र या कंपनीच्या पावडरच्या उत्पादनावर महाराष्ट्राने कायमची बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जॉन्सनचा परवाना का रद्द करण्यात आला? जॉन्सन बेबी पावडरचा वापर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने उत्पादित केलेल्या जॉन्सन बेबी पावडर या सौंदर्य उत्पादनाचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी जॉन्सन बेबी पावडर देशभरात वापरली जाते. मात्र या कंपनीच्या पावडरच्या उत्पादनावर महाराष्ट्राने कायमची बंदी घातली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जॉन्सनचा परवाना का रद्द करण्यात आला?

जॉन्सन बेबी पावडरचा वापर लहान मुलांच्या अंगाला लावण्यासाठी केला जातो. या पावडरचे नमुने नाशिक आणि पुण्यातल्या औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीन दोष असल्याचं कारण देत हा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील शासकीय विश्लेषक आणि औषध नियंत्रण प्रयोगशाळा या दोहोंनी पावडरचे नमुने हे राष्ट्रीय मानकांनुसार अयोग्य आहेत असा निष्कर्ष नोंदवला. ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तान्ह्या मुलांसाठी देशभरात वापरली जाते जॉन्सन बेबी पावडर

तान्ह्या मुलांसाठी देशभरात सर्वाधिक वापरली जाणारी पावडर म्हणजे जॉन्सन बेबी पावडर. जॉन्सन अँड जॉन्सन हे नाव बेबी प्रॉडक्टशी अनेक वर्षांपासून जोडलं गेलं आहे. मुंबई शासकीय विश्लेषक आणि औषध नियंत्रण प्रयोगशाळा यांनी पावडरचे नमुने राष्ट्रीय मानकांनुसार अयोग्य असल्याचा निष्कर्ष नोंदवला. तसंच तुम्हाला नमूद केलेल्या नियमांप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या सौंदर्य प्रसाधनाची उत्पादन अनुमती निलंबित किंवा रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यांत आली होती.

अन्न आणि औषध प्रशासनाने त्यांच्या पत्रकात काय म्हटलं आहे?

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना कायमचा रद्द केला आहे. मुंबईतल्या मुलुंड या ठिकाणी ही कंपनी बेबी पावडरचं उत्पादन करू शकणार नाही. FDA महाराष्ट्राने जॉन्सन बेबी पावडरचे नमुने पुणे आणि नाशिक या ठिकाणी तपासणीसाठी पाठवले होते. त्यात असं आढळून आलं की सदर नमुने हे सरकारने घालून दिलेल्या गुणवत्तेच्या नियमांमध्ये बसणारे नाहीत.

जॉन्सन बेबी पावडरचे नमुने सदोष

सदर नमुने सदोष आहेत त्यामुळेच या कंपनीचा उत्पादनचा परवाना रद्द करण्यात येत आहे असं सरकारच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. पावडरची उत्पादन पद्धती सदोष आहे तसंच या उत्पादनातील PH हा प्रमाणित मानकांनुसार नाही. ही पावडर वापरल्याने नवजात तसंच लहान मुलांच्या त्वचेला अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर पावडरचे उत्पादन सुरू ठेवणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे मुलुंड स्थित उत्पादन कारखान्याचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. असंही अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp