ठाकरे सरकार अडचणीत, आणखी एक IPS अधिकारी हायकोर्टात जाणार!
मुंबई: 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या लेटरबॉम्बमुळे आधीच ठाकरे सरकारवर टीका होता असताना आता आणखी एका गोष्टीमुळे राज्य सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. खरं तर वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे आज किंवा उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करुन पोलिस महासंचालक (डीजीपी) नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका हायकोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे. ‘मी आज किंवा उद्या […]
ADVERTISEMENT
मुंबई: 100 कोटींच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या लेटरबॉम्बमुळे आधीच ठाकरे सरकारवर टीका होता असताना आता आणखी एका गोष्टीमुळे राज्य सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. खरं तर वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे हे आज किंवा उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करुन पोलिस महासंचालक (डीजीपी) नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका हायकोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
‘मी आज किंवा उद्या याचिका दाखल करणार आहे.’ अशी माहिती संजय पांडे दिली आहे. ते म्हणाले की या याचिकेच्या माध्यमातून मी अशी मागणी करीन की, महाराष्ट्रातील पोलिस महासंचालक (डीजीपी) पदावर माझी नेमणूक करण्याबाबत न्यायालयाने सरकारला निर्देश द्यावे. यावेळी त्यांनी आपल्या ज्येष्ठतेचा मुद्दा याचिकेत उपस्थित करणार आहेत.
संजय पांडे यांनी असाही दावा केला की, काही अधिकाऱ्यांना बढती देण्यासाठी ‘मनमानी’ पद्धतीने नेमणुका केल्या गेल्या आहेत. खरं तर माजी डीजीपी सुबोध जयस्वाल हे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. त्यांची नियुक्ती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
देवेन भारतींच्या कामकाजावरही आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी उपस्थित केले प्रश्न
संजय पांडे यांच्यानंतर राज्यातील दुसरे सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांना डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता, परंतु मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर त्यांची जागा नगराळे यांनी घेतली. त्यामुळे राज्य सरकारने कार्यकारी पोलीस महासंचालक म्हणून चौथे सर्वात वरिष्ठ अधिकारी रजनीश सेठ यांची नियुक्ती केली आहे.
ADVERTISEMENT
यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालक पदावर पदोन्नती करण्यात आलेल्या संजय पांडे यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बदलीदरम्यान त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी पत्रात नमूद केलं होतं की, ‘जर सरकारने मी सक्षम अधिकारी नाहीत असं म्हटलं असतं तर मी ही बदली समजू शकलो असतो. पण मी सक्षम अधिकारी असून देखील माझ्यावर सातत्याने अन्याय झाला आहे.’
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांमधील नाराजी चव्हाट्यावर ! उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले संजय पांडे सुट्टीवर
संजय पांडेंनी आपल्या पत्रात काय म्हटलं होतं?
‘मला कायमच प्रत्येक महत्त्वाचं पद देण्यापासून डावलण्यात आलं.Anti Corruption DG, Mumbai Police CP ही पदं मला देण्यात आली नाहीत. सुबोध जैस्वाल डीजीपी पदावरून निवृत्त झाल्यानंतरही माझा या पदासाठी विचार झाला नाही. माझ्याकडे पदाचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला नाही त्याऐवजी माझ्यापेक्षा ज्युन्यिअर ऑफिसरला जबाबदारी दिलीत. मुंबईत स्फोटकं सापडण्याच्या प्रकरणानंतरही माझ्यावर पुन्हा अन्यायच झाला. GP पदाचा अतिरीक्त पदभार तुम्ही ज्युनिअर ऑफिसरकडे दिलात.’
‘सध्याच्या घडीला मी ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलो तरीही DG दर्जाच्या पोस्टींगसाठी माझा विचार न करता ज्युनिअर लेव्हलच्या अधिकाऱ्याला याचा पदभार सोपवला जातो हे माझ्यासाठी अत्यंत अपमानजनक आहे. या सगळ्या गोष्टी मला अपमानजनक वाटतात असंही पांडे यांनी म्हटलं आहे. संजय पांडे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे आणि लिहिलेल्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलातील वाद चव्हाट्यावर आले आहेत.’
‘१०० कोटी वसुली’ची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयासमोर अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली असून, त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या वतीने दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याच्या दाव्याची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी केली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT