Maharashtra HSC Result 2021: 12 वीचा निकाल जाहीर, राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के
पुणे: Maharashtra HSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2021 निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात बारावीचा एकूण निकाल हा 99.63 टक्के एवढा लागला आहे. (Maharashtra HSC result 2021) गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 8.97 टक्क्यांनी जास्त आहे. एकूण 13 लाख 19 […]
ADVERTISEMENT
पुणे: Maharashtra HSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2021 निकाल 3 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात बारावीचा एकूण निकाल हा 99.63 टक्के एवढा लागला आहे. (Maharashtra HSC result 2021) गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 8.97 टक्क्यांनी जास्त आहे. एकूण 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांपैकी 13 लाख 14 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर केवळ 4789 विद्यार्थी नापास झाले आहेत.
ADVERTISEMENT
यंदाच्या निकालातील एक गंमत म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच आपला निकाल पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली. यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, यंदाचा निकालात मागील वर्षीप्रमाणेच कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल हा 99.81 टक्के एवढा लागला आहे. तर त्या पाठोपाठ मुंबई आणि पुण्याचा नंबर लागतो. मुंबईचा निकाल 99.79 टक्के तर पुण्याचा निकाल 99.75 टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा 99.34 टक्के इतका लागला आहे.
हे वाचलं का?
HSC Result 2021: पाहा विभागानुसार निकाल
-
पुणे – 99.75
ADVERTISEMENT
नागपूर – 99.62
ADVERTISEMENT
औरंगाबाद – 99.34
मुंबई – 99.79
कोल्हापूर – 99.67
अमरावती – 99.37
नाशिक – 99.61
लातूर – 99.65
कोकण – 99.81
बारावीच्या निकालात मुलींची बाजी
यंदाच्या निकालात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. यावेळी राज्यात मुलींचा निकाल हा 99.73 टक्के लागला असून मुलांचा निकाल हा 99.54 टक्के इतका लागला आहे. अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
2021 शाखानिहाय निकाल (HSC Result : Streamwise Result)
-
कला (Arts) – 99.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते
-
वाणिज्य (Commerce) – 99.91 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले
-
विज्ञान (Science) – 99.45 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
-
व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 98.80 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते
दरम्यान, राज्यात तब्बल 46 विद्यार्थ्यांना 100 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 1372 एवढी आहे. तर 91,430 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर राज्यात 12 विद्यार्थी असे आहेत की, ज्यांना 35 टक्के गुण मिळाले आहेत. यंदाच्या निकालात 6542 महाविद्यालयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. तर शून्य टक्के निकाल एकाही महाविद्यालयाचा नाही.
12वी निकालाची तारीख, वेळ (Maharashtra HSC Result 2021 Date and Time)
महाराष्ट्र एचएससी निकाल 2021 Maharashtra HSC Result 2021 – 3 ऑगस्ट 2021 (मंगळवार) दुपारी 4:00 वाजता
Maharashtra Board HSC Result 2021: 12वीच्या निकालाची तारीख जाहीर, रोल नंबर असा करा डाऊनलोड
नेमका निकाल कसा पाहता येणार?
-
सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.
-
लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
-
यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.
-
त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.
-
समजा, तुमचा सीट नंबर M798789 असेल आणि तुमच्या आईचे नाव अंजली असं असेल तर तुम्ही M798789 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच ANJ असं टाकावं लागेल.
-
त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT