पुण्यात बहाद्दराने पोलिसालाच गंडा घातला, 'ती' ऑफर देत लाखोंना चुना कसा लावला?

मुंबई तक

वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराची तब्बल 4 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात पोलीस हवालदाराचीच फसवणूक

point

4 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांचं प्रमाण वाढत चाललंय. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे राज्यात चर्चेत आले. पण अशात एक वेगळा गुन्हा घडलाय. पुण्यात एका पोलिसालाच फसवल्याची घटना घडलीय. खासगी फायनान्स कंपनीच्या कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेली मोटार स्वस्तात मिळवून देतो असं म्हणत या पोलिसाची फसवणूक झालीये.

हे ही वाचा >>मर्सिडीज उलटली, 9 एअर बॅघ उघडल्या, तरी बड्या उद्योजकाचा मृत्यू; समृद्धीवर भीषण अपघात

वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराची तब्बल 4 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात प्रथमेश संजय गुगळे (रा. साईनगर सोसायटी, सातववाडी, हडपसर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पोलीस हवालदार पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात कार्यरत असून, दररोज दुचाकीवरून कामावर जात असतं. सतत दुचाकी चालविल्यानं त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला. यामुळे त्यांनी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एका मित्रानं सांगितलं की, मी तुम्हाला फायनान्स कंपनीने जमा केलेली कार स्वस्तात मिळवून देतो. ही कार खेड-शिवापूर येथील गोदामात असून, ती वाहन खरेदी-विक्रीचा एजंट प्रथमेश गुगळे याच्याकडे आहे, अशी माहिती मित्रानं दिली. मी स्वतः गुगळेकडून कार घेतली असं सांगितल्यानं पोलीस हवालदाराचा विश्वास बसला.

कार पाहण्यापासून फसवणुकीपर्यंत...

हे ही वाचा >>हसन मुश्रीफांना दिलासा, 'त्या' प्रकरणातून निर्दोष मुक्त होणार? कोर्टात काय घडलं? वाचा सविस्तर...

पोलीस हवालदार खेड-शिवापूर येथील गोदामात गेला आणि त्यांनी कार पाहिली. यावेळी गुगळेनं मोटारीची किंमत 4 लाख 80 हजार रुपये सांगितली. मात्र, नंतर चर्चेनंतर 4 लाख 20 हजार रुपये अंतिम किंमत ठरली. कार खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी तक्रारदाराने गुगळेला आवश्यक कागदपत्रे आणि 4 लाख 20 हजार रुपये रोख दिले. पण, त्यानंतर गुगळेचं गोदामात येणं बंद झालं. तक्रारदाराने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद येऊ लागला. गुगळेच्या साईनगर सोसायटीतील घरी जाऊन पाहिल्यावर घराला कुलूप असल्याचं आढळलं. त्यानंतर गुगळेने तक्रारदाराशी संपर्क साधला आणि आजीच्या निधनामुळे अहमदनगरला गेल्याचे सांगितले. मात्र, यानंतरही त्याने टाळाटाळ सुरू केली आणि पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. पैसे खर्च झाल्याचे सांगून त्याने तक्रारदाराची फसवणूक केल्याचे उघड झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp