महाराष्ट्र कोरोनाने सावरतोय पण Black Fungus ने घेरलं, झपाट्याने वाढत आहेत रुग्ण
पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्रात आता कुठे सावरत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (Black Fungus)या आजाराने डोकं वर काढलं आहे. सध्या या आजाराचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. पुण्यात दररोज सरासरी दोन ते तीन ब्लॅक फंगसचे रुग्ण सापडत आहेत. ज्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान अशा रुग्णांची संख्या खूपच कमी होती. पण आता […]
ADVERTISEMENT

पुणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्रात आता कुठे सावरत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (Black Fungus)या आजाराने डोकं वर काढलं आहे. सध्या या आजाराचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. पुण्यात दररोज सरासरी दोन ते तीन ब्लॅक फंगसचे रुग्ण सापडत आहेत. ज्यांच्यावर डॉक्टर उपचार करीत आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान अशा रुग्णांची संख्या खूपच कमी होती. पण आता विशेषत: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) प्रमाण वाढत आहे. या आजाराचा संसर्ग हा नाकापासून होतो ज्याचा परिणाम हा सायनस, फुफ्फुस आणि नंतर थेट मेंदूवर होतो.
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी, कमी रोग प्रतिकारशक्ती, कर्करोग किंवा एड्सग्रस्त लोकांसाठीदेखील हा ब्लॅक फंगस हा आजार घातक ठरू शकतो. ब्लॅक फंगसमध्ये मृत्यूचे प्रमाण 50 ते 60 टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते, कोव्हिड-19 च्या गंभीर रूग्णांच्या उपचारात स्टिरॉइड्सच्या वापरामुळे ब्लॅक फंगसचे प्रकार वाढत आहेत.
याची लक्षणे कोणती?
या आजारामध्ये नाकातून स्राव वाहणं, चेहरा सुजणं, डोळ्याच्या मागील भागामध्ये वेदना, खोकला, तोंड येणं, दात आणि हिरड्यांना दुखणं अशी लक्षणे ब्लॅक फंगस असलेल्या रूग्णांमध्ये दिसून येतात. कोरोना उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या औषधांच्या साइड इफेक्ट्समुळे ब्लॅक फंगसची लागण होत असल्याचं आता समोर येत आहे.