महाराष्ट्रात पुन्हा एकदा दिवसभराच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत घट, 49 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा घट पाहण्यास मिळाली आहे. ही या महिन्यातली पहिलीच घट आहे मात्र सप्टेंबर महिन्यात तीन वेळा रूग्णसंख्येत घट पाहण्यास मिळाली होती. आज दिवसभरात राज्यात 2696 नवीन रूग्णांची निदान झालं आहे.

ADVERTISEMENT

20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या

20 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी सर्वात कमी रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. 2583 रूग्ण गेल्या सोमवारी दिवसभरात पॉझिटिव्ह होते

हे वाचलं का?

27 आणि 28 सप्टेंबर या सलग दोन दिवशी रूग्णसंख्येत घट

त्यानंतर 27 सप्टेंबरला 2432 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती.

ADVERTISEMENT

तर 28 सप्टेंबरला 2844 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली होती. सलग दोन दिवस रूग्णसंख्या 3 हजारांच्या आत होती. आता आज ऑक्टोबरच्या दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आज दिवसभरात 3062 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 77 हजार 954 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.27 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 49 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 90 लाख 74 हजार 660 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 56 हजार 657 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 47 हजार 6 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1370 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात आज घडीला 35 हजार 955 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2696 नव्या रूग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 65 लाख 56 हजार 657 झाली आहे.

‘कोरोनाची तिसरी लाट नक्की येणार’ जाणून घ्या हे वक्तव्य कुणी आणि का केलं आहे?

राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार

राज्यात ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, निर्णय स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सरकारने शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.

राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय

राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT