Subramanian Swamy: नरेंद्र मोदी म्हणजे रावण, पंढरपूरसह इतर मंदिरं उद्ध्वस्त करण्याचा डाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंढरपूरच्या विकासाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने पंढरपूरचा उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्याचं निश्चित केलं आहे. या कॉरिडॉरमध्ये मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्गातील सुमारे ५०० हून जास्त घरं भूसंपादित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरला विरोध होतो आहे. अशात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही या कॉरिडॉरला विरोध दर्शवला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केली आहे. त्यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray Speech : यंदाचा रावण डोक्यांचा नाहीये, खोक्यांचा; उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाच्या वर्मावर बोट

सुब्रमण्यम स्वामी यांचं ट्विट काय आहे?

सुब्रमण्यम स्वामी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, नरेंद्र मोदी हे रावणासारखे धार्मिक असल्याचा दावा करून उत्तराखंडमध्ये वाराणसीप्रमाणे मंदिरे पाडत आहेत किंवा बळकावत आहेत. आता पंढरपूरच्या पवित्र स्थळांची नासधूस करण्याची योजना फडणवीस यांच्यासोबत आखत आहेत. त्यामुळे हा संहार रोखण्यासाठी मी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार आहे, तसेच पंढरपूर मध्ये येऊन विठ्ठलाची पूजा करणार आहे. असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या संदर्भात पंढरपूर मधील कॉरोडोर मध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांनी स्वामींची भेट घेतली .

हे वाचलं का?

देशभरातील तमाम वारकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर येथे कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. वाराणसीच्या धर्तीवर हा कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचा व काही वारकरी मंडळींच्या संघटनांचा याला विरोध आहे. पंढरपूर विकास आराखड्यामध्ये पहिल्यांदा मंदिराचा गाभा, मग मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. परंतु, या कॉरिडॉरला बाधित स्थानिकांनी विरोध केला आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही टीका करण्यात येत आहे. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण असे संबोधले आहे.

नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार

विठ्ठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट हा माऊली कॉरिडॉर हा खरा वादाचा मुद्दा असून मंदिर परिसरातील रस्ते थेट 200 फुटापर्यंत वाढवण्याचे नियोजन प्रशासन करत आहे . सध्या मंदिर परिसरात केवळ 60 फुटांचे रस्ते असून अजून जवळपास 140 फूट रुंदी वाढल्याने केवळ या कॉरिडॉरमुळे जवळपास एक हजारापेक्षा जास्त नागरिकांची घरे आणि दुकाने जमीनदोस्त होणार असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT