Maharashtra corona cases: महाराष्ट्रात दिवसभरातील कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा किती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज (6 जून) दिवसभरात कोरोनाचे (Corona Paitents) 12,557 नवे रुग्ण सापडले आहेत. मागील काही दिवसात कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र असं असलं तरीही चिंतेची बाब म्हणजे कोरोना मृतांचा आकडा अद्याप तरी फार नियंत्रणात आलेला नाही. आज राज्यात तब्बल 233 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात 1,00,130 जणांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 85 हजार 527 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ADVERTISEMENT

राज्यात आज 14,433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 55,43,267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.05 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 233 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.72 टक्के एवढा आहे.

Maharashtra Lockdown: राज्यातील निर्बंध शिथील केलेले नाहीत, पाहा मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले!

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,65,08,967 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,31,781 (15.97 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 13,46,389 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,426 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,85,527ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

ADVERTISEMENT

  • मुंबई (Mumbai) – 18 हजार 041

ADVERTISEMENT

  • ठाणे (Thane) – 16 हजार 672

  • पुणे (Pune) – 21 हजार 216

  • नागपूर (Nagpur) – 9 हजार 244

  • नाशिक (Nashik)- 5 हजार 891

  • कोल्हापूर (Kolhapur) – 18 हजार 734

  • अहमदनगर (Ahmednagar) – 7 हजार 278

  • सातारा (Satara) – 15 हजार 151

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 2 हजार 595

  • लातूर (Latur) – 2 हजार 833

  • Exclusive : Delta व्हेरिएंटमुळेच देशात आणि महाराष्ट्रात Corona ची दुसरी लाट, अभ्यास अहवालात निष्कर्ष

    प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 21 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय कोल्हापुरात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. कोल्हापूरमध्ये सध्या 18 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

    मुंबईत दिवसभरात सापडले 794 रूग्ण पॉझिटिव्ह

    मुंबईत दिवसभरात 794 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 833 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 6 लाख 78 हजार 278 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95 टक्के आहे. डबलिंग रेट 527 दिवसांवर गेला आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT