राज्यात पहिली ते चौथीचे वर्ग लवकर सुरू होणार? जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसते आहे. शाळा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी असे शाळांचे वर्ग आधीच सुरू आहेत. आता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. ग्रामीण भागातले शिक्षक, शाळा चालक, पालक अशी सगळेच जण यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास संमती दिली आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

मोठी बातमी! 4 ऑक्टोबरपासून मुंबईतल्याही शाळा सुरू होणार

काय म्हणाले राजेश टोपे?

हे वाचलं का?

चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

राजेश टोपेंनी हे देखील सांगितलं की , नाट्यगृह, सिनेमागृहांना आता 50 टक्के उपस्थितीसह संमती देण्यात आली आहे. ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं की, सध्या लग्नसराईमुळं गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही. बिनधास्तपणा जाणवतोय. ही मानसिकता घातक आहे. जागरूक राहिले पाहिजे. दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आता रोज सरासरी 700 ते 800 रुग्ण सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. मुले आजारी पडल्याचं प्रमाण जास्त नाही. पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही. बूस्टर डोससंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे. तर त्यांना बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना ते म्हणाले की, त्यांची प्रकृती चांगली आहे. फिजिओथेरपी सुरू आहे. ते पूर्ण करुन कामाला लागावं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT