Nana Patole: पटेल-पटोले वादामुळे महाविकास आघाडीत ठिणगी? एवढे का संतापले नाना?

मुंबई तक

ऋत्विक भालेकर, व्यंकटेश दुड्डुमवार – मुंबई तक प्रतिनिधी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघाती आरोप केला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. नानांचा पक्षांतराचा इतिहास उगळून अजितदादांनी जणू त्यांच्या जखमेवर मीठच चोळण्याचं काम केलं. त्यावर भल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देत नानांनीही दादांवर प्रतिहल्ला चढवला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ऋत्विक भालेकर, व्यंकटेश दुड्डुमवार – मुंबई तक प्रतिनिधी

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघाती आरोप केला त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. नानांचा पक्षांतराचा इतिहास उगळून अजितदादांनी जणू त्यांच्या जखमेवर मीठच चोळण्याचं काम केलं. त्यावर भल्या पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देत नानांनीही दादांवर प्रतिहल्ला चढवला आहे.

या सगळ्यात भोंगे, हनुमान चालीसा, अयोध्या आणि भगव्याच्या राजकारणात थोडी अडगळीत पडलेली काँग्रेस पुन्हा एकदा आपली न्यूज व्हॅल्यू दाखवत चर्चेत आली आहे.

पण नेमकं असं काय घडलं की नानांचा पारा इतका चढलाय? तर निमित्त आहे भंडारा-गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणुकांचं. नानांचा आरोप आहे की, महविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये लिखित करार असून देखील राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp