मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे बोंबलली, घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे ऑफिसमधून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कर्जत, कसारा या ठिकाणी जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेने ट्विट करत ही माहिती दिली आहे. मुंबईत आलेल्या पावसामुळे […]
ADVERTISEMENT
मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे ऑफिसमधून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कर्जत, कसारा या ठिकाणी जाणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत आलेल्या पावसामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचं टाइमटेबल कोलमडलं आहे. मुसळधार पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, ठाणे ते दिवा, ठाणे ते कल्याण, ठाणे ते कर्जत/ कसा या सेक्शनमध्ये ट्रेन्स उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
ठाण्यात आणि मुंबईत जोरदार पाऊस
ठाण्यात आणि मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. नवी मुंबई, ठाणे परिसरात वीजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळतो आहे. आज संध्याकाळच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर सगळ्यात आधी परिणाम झाला. घरी जाणारे चाकरमानी स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत. मध्य रेल्वे ठाण्याच्या पुढे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाल्याचं पाहण्यास मिळतं आहे.
हे वाचलं का?
ठाणे, कळवा, मुंब्रा या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. लोकल ट्रेनच्या रूळांवर पाणी साठल्याने सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत. टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अर्धा तास कल्याण ते कसारा वाहतूक बंद होती. याचा देखील वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मुंब्रा आणि कळवा भागात झालेल्या प्रचंड पावसामुळे पारसिक डोंगरावरून पाण्याचे मोठे प्रवाह थेट रेल्वे ट्रॅक वर आले. मध्य रेल्वेच्या ट्रॅक बाजूलाच पारसिकचा डोंगर असल्याने हे पाणी थेट ट्रॅकवर येतं. पावसाचा जोर जसा कमी झाला तसे पाणी देखील कमी झालं आहे. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅक वरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे बंद ठेवण्यात आली होती. पाणी ओसरल्याने ही वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT