महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई, १५ लाखांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याला घेतलं ताब्यात

मुंबई तक

झाकीर मिस्त्री, प्रतिनिधी नालासोपार: महाराष्ट्र ATS ने आज पहाटेच्या सुमारास नालासोपारा येथे छापा टाकून, झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक समितीच्या सदस्यला ताब्यात घेतले आहे. करु हुलास यादव, (वय ४५) असे ताब्यात घेतलेल्या माओवादी सदस्याचे नाव असून तो झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसंडी गाव दोडगा, तहसीलचा राहणारा असून झारखंड सीपीआय (माओवादी) मध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

झाकीर मिस्त्री, प्रतिनिधी

नालासोपार: महाराष्ट्र ATS ने आज पहाटेच्या सुमारास नालासोपारा येथे छापा टाकून, झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक समितीच्या सदस्यला ताब्यात घेतले आहे. करु हुलास यादव, (वय ४५) असे ताब्यात घेतलेल्या माओवादी सदस्याचे नाव असून तो झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील कटकमसंडी गाव दोडगा, तहसीलचा राहणारा असून झारखंड सीपीआय (माओवादी) मध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने आज पहाटे नालासोपारा पूर्व धनवी राम नगर येथील छापा टाकून याला ताब्यात घेतले आहे. 2004 पासून या माओवाद्याच्या डोक्यावर 15 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.

महाराष्ट्र ATS ने कशी केली कारवाई?

पहाटेच्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने एका चाळीवर छापा टाकला. त्यावेळी धनवी, रामनगर, नालासोपारा (पू) येथून आणि कारू हुलासला ताब्यात घेतले. यादव, झारखंडमधील प्रतिबंधित सीपीआय (माओवादी) च्या प्रादेशिक समितीचा सदस्य असल्याचे तपासात समोर आले. झारखंड पोलिसांना या कारवाई संदर्भात पुढील माहिती देण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरु आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटला यादवबद्दल विशिष्ट माहिती मिळाली होती, त्यानंतर त्यांनी छापा टाकला. झारखंडमधील हजारीबाग येथील रहिवासी असलेल्या यादवच्या डाव्या पायाला जखम झाली होती आणि गेल्या दोन महिन्यांपासून तो वैद्यकीय उपचारांसाठी नालासोपारा येथे होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र एटीएसने झारखंड पोलिसांना माहिती दिला आहे. झारखंड पोलिसांचे पथक संध्याकाळी मुंबईत पोहोचेल. स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर यादवला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp