भाजपच्या बंडखोर नगरसेवकांचा राष्ट्रवादीसोबत घरोबा; नगरपंचायतीवर फडकवला झेंडा
-नितीन शिंदे,सोलापूर माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नव्या आघाडी उद्याला आली. देशमुख यांच्या नावाला भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी राष्ट्रवादीसह अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. भाजपच्या बंडखोरांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करत खेळलेल्या राजकीय चालीची माळशिरससह जिल्ह्यात चर्चा होत आहे. माळशिरस नगरपंचायतीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. झालं असं […]
ADVERTISEMENT

-नितीन शिंदे,सोलापूर
माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नव्या आघाडी उद्याला आली. देशमुख यांच्या नावाला भाजपच्या काही नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी राष्ट्रवादीसह अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. भाजपच्या बंडखोरांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा करत खेळलेल्या राजकीय चालीची माळशिरससह जिल्ह्यात चर्चा होत आहे.
माळशिरस नगरपंचायतीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. झालं असं की, माळशिरस नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. एकूण 17 जागांपैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तर उर्वरित राष्ट्रवादीचे 2, अपक्ष 3 आणि स्थानिक मविआचे 2 असे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे १० (भाजप), २ (राष्ट्रवादी), ३ (अपक्ष), ३ (मविआ) असं बलाबल होतं.