Mangalprabhat Lodha : शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्रा सुटकेशी, नव्या वादाला फुटलं तोंड
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या वादाची धग अद्याप कायम असून, त्यात आता नव्या विधानाची भर पडली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी करत उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू […]
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या वादाची धग अद्याप कायम असून, त्यात आता नव्या विधानाची भर पडली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी करत उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपचे उदयनराजे भोसले यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं टाळण्याचं आवाहन केलेलं असताना आता मंगलप्रभात लोढांनी केलेल्या विधानाने वादात आणखी भर टाकलीये.
364व्या शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड किल्ल्यावर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.
हे वाचलं का?
शिवप्रताप दिन सोहळ्यात मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी भाषण केलं. मंगलप्रभात लोढांनी बोलताना उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीची तुलना थेट औरंगजेबाशी करत एकनाथ शिंदेंच्या मार्गातील व्हिलन ठरवलं. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडाची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.
मंगलप्रभात लोढा एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल काय म्हणाले?
मंगलप्रभात लोढा शिवप्रताप दिन सोहळ्यात म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं, परंतु छत्रपती शिवराय स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले”, असं विधान मंगलप्रभात लोढांनी केलं.
ADVERTISEMENT
मंगलप्रभात लोढा, एकनाथ शिंदे आणि शिवरायांबद्दल काय बोलले? @ShivSena #ShivajiMaharaj #mangalprabhatlodha #eknathshinde pic.twitter.com/siEmfVFeic
— Mumbai Tak (@mumbaitak) November 30, 2022
मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर अमोल मिटकरींची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर टीका केलीये. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व 40 आमदारांच्या बंडाशी करून पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केलं आहे. शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान आज परत एकदा जनतेसमोर आले’, असं मिटकरी म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT