एकनाथ शिंदेंना सोलापुरात धक्का! गंभीर आरोप करत मनोज पवारांची ठाकरे गटात ‘घरवापसी’
शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर जोरात सुरूये. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेले अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात जात असतानाच एकनाथ शिंदेंना सोलापुरात धक्का बसलाय. कारण आहे शिंदे गटाचे सोलापुरचे उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केलाय. मनसे, भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर जोरात सुरूये. शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेले अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात जात असतानाच एकनाथ शिंदेंना सोलापुरात धक्का बसलाय. कारण आहे शिंदे गटाचे सोलापुरचे उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केलाय. मनसे, भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलंय. (Shinde faction leader Manoj Pawar Joined shiv sena (Uddhav balasaheb Thackeray)
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर मनोज पवारांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा देत शिंदे गटात प्रवेश केला होता. शिंदे गटाकडून मनोज पवार यांच्यावर सोलापूर शिंदे गटाच्या उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, याच पवारांनी आता एकनाथ शिंदेंची साथ सोडत उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतलीये.
एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. मनोज पवार यांच्याबरोबर शिंदे गट, मनसे, भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह 21 जणांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला आहे.
Asha Mamidi : ‘…तर आम्ही सुषमा अंधारेंना चोप देऊ’; शिंदे गटाच्या नेत्या म्हणाल्या, ‘अंधारे माकडीण’
मनोज पवार यांचे शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप
शिंदे गटाचे सोलापूर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत ठाकरे गटात प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी अक्कलकोट तालुक्यातील आहेत.
शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश करताना मनोज पवार यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे एकदम निष्क्रिय माणूस असल्याची टीका मनोज पवार यांनी केलीये. आपली पोळी शेकून घेण्यासाठी हे लोक शिंदे गटात गेले आहेत. यांचे दोन नंबर धंदे आहेत, अशी टीका मनोज पवार यांनी केलीये.
Uddhav Thackeray : महाराष्ट्रासह देशात पुढच्या दारानेच आणीबाणी आणण्याची तयारी
मनोज पवार यांनी शिंदे गट जास्त काळ टिकणार नाही, असंही राजकीय भाकित केलंय. ‘शिंदे गट हे दोन वर्ष देखील टिकणार नाही. यांची लवकरच माती होणार आहे’, अशी राजकीय भविष्यवाणी मनोज पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश करताना केली आहे.